Nagpur Saam
महाराष्ट्र

बांधकाम मजुराची धारदार शस्त्राने हत्या, मृतदेह तिथेच फेकून दिला अन्.. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड | Nagpur

Deadly Attack in Nagpur: नागपूरच्या भांडेवाडी परिसरात रात्रीच्या सुमारास एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

रात्रीच्या सुमारास एका तरूणाची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मृत तरूण बांधकाम मजूर म्हणून कार्यरत होता. २ दिवसांपूर्वी कामावर गेला. मात्र, तो काही घरी परतलाच नाही. तरूणाचा मृतदेह सापडल्यानंतर त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. ही घटना नागपूर येथे घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. हत्येचं नेमकं कारण काय? याचा शोध पारडी पोलीस घेत आहेत.

सतीश मेश्राम (वय वर्ष ३१) असे मृत तरूणाचे नाव आहे. तो नागपुरातील भांडेवाडी परिसरातीस रहिवासी होता. तो बांधकाम मजूर म्हणून कार्यरत होता. दोन दिवसांपूर्वी कामावर गेला मात्र घरी परतला नाही. सतीश घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. शोधा शोध करून मिळून न आल्याने त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पारडी पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

शुक्रवारी रात्री भांडेवाडी रेल्वे स्थानकावरील बांधकाम सुरू असलेल्या प्लॅटफॉर्म जवळ काही लोकांना मृतदेह आढळून आला. तेव्हा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. तो मृतदेह सतीशचा असल्याचं निशपन्न झालं. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, सतीशची हत्या धारदार शस्त्राने करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. हत्येमागचे नेमके काय कारण आहे? सतीशची हत्या नेमकी कुणी आणि का केली? याचा शोध पारडी पोलीस घेत आहे. सतीशची हत्या केली असल्याचं समोर आल्यानंतर कुटुंबाने आक्रोश व्यक्त केला असून, आरोपीला शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कुटुंबाने केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP: महिलांना दरमहा ₹२५०० अन् गरीब कुटुंबाला २ सिलिंडर फ्री देणार, भाजपकडून मोठी घोषणा

खरातकडे 4 सिमकार्ड, महिलांसाठी खास नंबर, 3 कार्डवरून 3 वेगळे कांड, तपासात धक्कादायक माहिती आली समोर

घराला आग लागून घडली भीषण दुर्घटना; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

Gold Rate : सोन्याच्या दारात मोठी घसरण, चांदी ५ हजारांनी वाढली ;वाचा सुवर्णनगरीतले आजचे दर

Maharashtra Live News Update: मुंबई महापालिकेच्या नव्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी पदभार स्वीकारला

SCROLL FOR NEXT