Gondia Anganwadi News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : धक्कादायक प्रकार! अंगणवाडीच्या खाऊमध्ये आढळला मेलेला उंदीर

Gondia Anganwadi News : गोंदिया जिल्ह्यात अंगणवाडीतील बालकांना वाटप करण्यात आलेल्या ‘मल्टी मिक्स सिरीयल्स अ‍ॅण्ड प्रोटीन्स’ खाऊच्या पाकिटात मेलेला उंदीर आढळल्याने संतापाची लाट उसळली आहे. रायगडनंतर गोंदियातही असा प्रकार घडला आहे.

Alisha Khedekar

  • गोंदिया जिल्ह्यात अंगणवाडीच्या खाऊच्या पाकिटात मेलेला उंदीर सापडला आहे

  • रायगडनंतर पुन्हा एकदा प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे

  • पालकांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे

  • सुदैवाने ही बाब वेळीच लक्षात आल्यानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही

रायगड जिल्ह्यात जानेवारी महिन्यात अंगणवाडीच्या मुलांच्या खाऊमध्ये मेलेला उंदीर आढळून आला होता. यानंतर आता गोंदिया मधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांकरीता घरपोच वाटप होणार्‍या 'मल्टी मिक्स सिरीयल्स अ‍ॅण्ड प्रोटीन्स' खाऊच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर आढळून आला आहे. या घटनेने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या धवलखेडी येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. या अंगणवाडीतून ६ महिने ते ३ वर्षे वयापर्यंतच्या लहान मुलांना प्रोटीन्सची पाकिटे पुरवली जातात. घरी गेल्यानंतर लाभार्थ्यांनी पाकीट उघडून बघितल्यावर ही बाब समोर आली. मात्र या घटनेनंतर स्थानिकांचा शासन प्रशासनावर चांगलाच रोष बघायला मिळाला.

घडलेल्या घटनेनंतर या संदर्भात आदिवासी नेते व सामाजिक कार्यकर्ते मधुकर दिहारी यांनी जर अशा पद्धतीने आदिवासींच्या जीवाशी खेळ करत असाल तर आंदोलन करू असा इशारा दिला आहे. या घटनेने परिसरातील पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. सुदैवाने ही बाब पालकांच्या वेळीच लक्षात आल्याने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

रायगडमध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती

रायगडच्या जिल्ह्यातील पेणमध्ये जानेवारी महिन्यात एका अंगणवाडी शिक्षिकेला विद्यार्थ्यांच्या खाऊ मध्ये अशा प्रकारचा मेलेला उंदीर सापडला. या घटनेनंतर मंत्री अदिती ताई तटकरे यांनी मुलांच्या घरी वाटप केलेली सर्व पाकिट परत मागवून ती बालविकास प्रकल्प कार्यलयात पाठवली. सदर घटना शिक्षकांच्या वेळीच लक्षात आल्याने विद्यार्थ्यांचे प्राण थोडक्यात वाचले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मकरसंक्रातीला मुंबईत आक्रीत घडलं, पाहुण्यांकडे गेलेल्या बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू

Municipal Elections Voting Live updates : पुणे महापालिकेसाठी मतदानाला सुरुवात

आजचा दिवस अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी उत्तम; पंचांगानुसार कोणाला मिळणार फायदा?

Success Story: जोडीदार असावा तर असा! बॉयफ्रेंडच्या मदतीने स्पर्धा परीक्षा पास; DSP दिव्या झरिया यांचा प्रेरणादायी प्रवास

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा; दोन गटात तुफान हाणामारी

SCROLL FOR NEXT