कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये Kolhapur धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची धार कायम सुरु आहे. हीच परिस्थिती इचलकरंजी Ichalkaranji शहर परिसरात देखील कायम आहे. पंचगंगा Panchganga नदीची पाणीपातळी 54 फुटांवर पोहोचून तीने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे. सावधगिरीचा उपाय यासाठी एनडीआरएफच्या NDRF पथकांना रवाना करण्यात आले आहे.
चार दिवस रेड अलर्ट Red alert कोल्हापूर जिल्ह्यात देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने सावधानतेचा इशारा जिल्ह्याला दिला आहे. महापुराची संभाव्य परिस्थिती लक्षात घेता सावधगिरीचा उपाय यासाठी एनडीआरएफच्या NDRF पथकांना रवाना करण्यात आले आहे. आज सकाळी दोन एनडीआरएफ पथके आठ वाजता पुणे Pune येथून कोल्हापूरसाठी रवाना झाली आहेत. अशी माहिती एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे..
यासाठी १ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत या पथकांना कोल्हापुरात तैनात करण्याचे नियोजन केले होते. यातच वाहतुकीसाठी नदीवरील लहान पूल Brig बंद करण्यात आला आहे. तसेच पूरबाधित क्षेत्र व नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कता बाळगण्याचा इशारा दिला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर सर्व नद्यांच्या पाणीपातळी सतत वाढत आहे. तसेच इचलकरंजी मधून वाहणाऱ्या पंचगंगा नदीची पाणीपातळी सातत्याने वाढत आहे.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.