Gautami Patil Father News Saam Tv
महाराष्ट्र

Gautami Patil Father News: 'त्यांनी आयुष्यभर आमच्यासाठी काहीही केलं नसलं तरी...', वडिलांची जबाबदारी स्वीकारत गौतमी पाटीलने घेतला मोठा निर्णय

Gautami Patil Latest News: गौतमी पाटीलच्या वडिलांची प्रकृती गंभीर असून सध्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Priya More

Gautami Patil:

प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या आपल्या नृत्याच्या तालावर संपूर्ण महाराष्ट्राला नाचवत आहे. 'सबसे कातिल गौतमी पाटील' सोशल मीडियावर आपल्या डान्समुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या गौतमी पाटील जरा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

गौतमी पाटीलचे वडील धुळ्यामध्ये बेवारस आणि बेशुद्धावस्थेत आढळून आले होते. त्यांची प्रकृती गंभीर असून सध्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गौतमीच्या वडिलांची बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर (Social Media) पसरली. त्यानंतर वडिलांच्या प्रकृतीची माहिती कळताच गौतमी पाटील त्यांच्या मदतीसाठी धावून आली आहे.

धुळ्यामध्ये दोन दिवसांपूर्वी गौतमी पाटीलचे वडील रविंद्र बाबूराव नेरपगारे पाटील हे बेवारस अवस्थेत आढळून आले होते. त्यांची प्रकृती खूपच बिघडल्याचे पाहून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी धुळ्यातील हिरे रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर या सामाजिक कार्यकर्त्यांना रविंद्र यांच्या खिशामध्ये सापडलेल्या आधारकार्डवरून ते गौतमी पाटीलचे वडील असल्याचे कळाले. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर काही मॅसेज व्हायरल केले. ही बातमी प्रसारमाध्यमांवर आली. गौतमीला वडिलांची प्रकृती गंभीर असल्याचे कळाल्यानंतर तिने तात्काळ त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

गौतमी पाटीलने तात्काळ धुळ्याच्या माजी महापौर जयश्री अहिरराव यांच्याशी संपर्क साधला आणि आपल्या वडिलांना खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर गौतमीने तिच्या मावशीला देखील फोन करुन वडिलांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करण्यास सांगितले. त्यासोबत तिने तिच्या मावशीला वडिलांना पुढील उपचारासाठी पुण्याला घेऊन येण्यास सांगितले. आता गौतमीच्या वडिलांवर पुण्यामध्ये उपचार होणार आहेत.

गौतमीची मावशी सुरेखा पाटील यांनी सांगितले की, गौतमी पाटील ही लहानपणापासून तिच्या मामांकडे राहते. तिची आई देखील तिथेच राहते. तिच्या वडिलांनी कोणतेही कर्तव्य पूर्ण केले नाही. तरीसुद्धा गौतमी पाटील पुढे येत मुलीचे कर्तव्य बजावत आहे. मुलीचं कर्तव्य काय असते हे गौतमीच्या भूमिकेमधून दिसून येत आहे' त्याचसोबत, गौतमीने वडिलांनी जरी आयुष्यभर आमच्यासाठी काहीही केले नसले तरीसुद्धा माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे मी करेन. आता त्यांचे पुढील सर्व उपचार मी पुण्यात करेल.', असे गौतमी पाटीलने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT