dharashiv saam tv
महाराष्ट्र

Dharashiv News : सर्व प्रकल्पातील पाणी पिण्याकरिता आरक्षित : धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

या निर्णायाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Dharashiv News : धाराशिव जलसंपदाच्या 206 प्रकल्पात केवळ 10 टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. परिणामी सर्व प्रकल्पातील पाणी हे केवळ पिण्याकरिता आरक्षित करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. (Maharashtra News)

जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे (collector sachin ombase) यांनी भविष्यातील निर्माण होणारी पाणी टंचाईची अडचण लक्षात घेता हे निर्देश दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने आता पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णयावर अंमलबजावणी करण्याचे नियाेजन सुरु केले आहे.

या पाण्याचा इत्तरत्र कुठेही वापर होऊ नये यासाठी मंडळ निहाय भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. अनाधिकृत पाणी उपसा केल्यास भरारी पथकास संबंधिताचे उपसा करण्याचे मोटार संच जप्त करणे, दंड आकारणे, विद्युत पुरवठा खंडीत करणे व फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकारी यांनी दिलेत.

जिल्ह्यात कोणीही अनाधिकृत पाणी उपसा करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT