Maharashtra Assembly Elections saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ठाकरेंच्या उमेदवाराला जिवे मारण्याचा प्रयत्न, घरात घुसून तिघांचा हल्ला, मालेगावात ठाकरे vs शिंदे वादाचे फटाके!

Malegaon Dada Bhuse vs Advay Hire : मालेगावमधील राजकीय वातावरण तापलेय. ठाकरेंच्या उमेदवाराला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलेय.

Namdeo Kumbhar

Dada Bhuse vs Advay Hire Nashik Malegaon News : विधानसभा निवडणूक आता ऐन रंगात आली आहे. प्रचार शिगेला पोहचलाय. उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. पण नाशिकमधील मालेगावमध्ये वेगळेच राजकारण सुरु असल्याचे दिसतेय. ठाकरेंचे उमेदवार अद्वय हिरे यांनी मालेगावमधील शिंदेंचे प्रतिस्पर्धी उमेदवार दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केलाय. दादा भुसे यांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अद्वय हिरे यांनी केला. अद्वय हिरे यांनी प्रकरणी पोलिसांत धाव घेतली, असून तीन जणांविरोधात तक्रार दाख करण्यात आली.

मालेगाव शहरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आला आहे. अद्वय हिरे सोयगाव भागात एका कार्यकर्त्याच्या घरी असताना प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. मालेगावातील एका कार्यकर्त्याच्या घरी गेले असता बाहेरून काही गुंडांनी दगडफेक आणि धमकावल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे. अद्वय हिरे यांनी हल्लेखोर गुंडांकडे पिस्तूल असल्याचा दावाही केलाय. त्याशिवाय अद्वय हिरे यांनी या प्रकरणी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

अद्वय हिरे काय म्हणाले ?

सोयगावमध्ये आरपीआयचे नेते दिलीप अहिरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होते. त्यांच्या घरी बसलो असता टायसन नावाचा गुंड आणि त्याचे दोन सहकारी आले. त्यांच्याकडे गावठी कट्टा होता. मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. माझ्या सहकाऱ्यांनी त्यांना रोखले. मी तात्काळ मी पोलिसांना बोलवले. पोलिस आल्यामुळे प्रकार रोखला, असे अद्वय हिरे म्हणाले.

अद्वय हिरे यांनी सुरक्षा देण्याची मागणीही केली आहे. ते म्हणाले की, मला सुरक्षा देण्यात यावी, अशी मी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. राज्यात एका माजी मंत्र्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तरी राज्य सरकारने काही केले नाही. आज नाशिकचा पालकमंत्री मोठा गुंड आहे. पराभवाच्या भीतीने ते माझीही हत्या करण्यासाठी मागे पुढे पाहणार नाहीत. उद्या माझं काही बरे वाईट झाले तर याची जबाबदारी पोलिस, पालकमंत्री आणि राज्य सरकारची असेल.

दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप-

पालकमंत्र्याच्या या भ्याड मुद्द्याचा मी निषेध करतो. मालेगावात ज्या लोकांकडे कट्टे आहेत. त्या सर्वांना पालकमंत्री पोसतात. त्या सर्वांना जेलमध्ये मनी ऑर्डर पाठवण्याचे काम पालकमंत्री करतात. त्यांना बाहेर काढण्याचे, जामीन काढण्याचेही कामही पालकमंत्री करतात. दगडफेक, शिविगाळ केल्याची नोंदही केली जाईल. पोलिसांनी काही वगळले तर आम्ही पक्षाच्या वतीने नाशिक एसपीला पत्र देणार आहोत, असे हिरे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

Shahapur : अखेर चौथ्या दिवशी सापडला युवकाचा मृतदेह; भारंगी नदीत बुडून झाला मृत्यू

Skin Care: सतत खोट्या आयलॅशेस लावण्याने होतील हे नुकसान, वेळीच व्हा सावधान

Body changes after cancer: कॅन्सर झाल्यानंतर शरीरामध्ये कोणते मोठे बदल दिसून येतात?

Kalyan News: कोळसेवाडी व विजयनगरमध्ये मध्यरात्री गाड्यांची तोडफोड; कल्याणमध्ये भीतीचं वातावरण|VIDEO

SCROLL FOR NEXT