अभिजीत दिपकेंनी केलेल्या राजीनाम्याच्या मागणीनंतर स्वतः शिक्षणमंत्री दादा भुसेंनी स्पष्टीकरण दिलंय.  Saam TV
महाराष्ट्र

अभिजीत दिपकेंनी काल मागितला राजीनामा; आज शिक्षणमंत्र्यांनी दिली कबुली, काय म्हणाले वाचा!

abhijeet dipke school inspection dada bhuse response : शाळांच्या मुद्द्यांवर शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अभिजीत दिपकेंनी केल्यानंतर स्वतः दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले भुसे? वाचा...

Nandkumar Joshi

अजय सोनावणे, मालेगाव | साम टीव्ही

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर दिल्लीत जंतरमंतरवर केलेल्या आंदोलनाला यश आल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंनी महाराष्ट्रातल्या शाळांच्या सुधारणांकडे मोर्चा वळवला आहे. सरकारी शाळांमधील भीषण वास्तव, भयावह परिस्थिती आणि शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आणल्यानंतर दिपकेंनी थेट राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर आज स्वतः शिक्षणमंत्री दादा भुसेंनी शाळांच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देत, त्रुटींबाबत कबुलीही दिलीय.

सरकारी शाळांच्या परिस्थितीवरून अभिजीत दिपकेंनी एकप्रकारे सत्ताधाऱ्यांची 'शाळा' घेण्यास सुरुवात केलीय. राज्यातील विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी देत आहेत. तेथील भयानक वास्तव समोर आणण्याचं काम केलं जात आहे. शाळांच्या परिस्थितीला शिक्षण विभाग आणि राज्याचे शिक्षण मंत्र्यांना त्यांनी जबाबदार ठरवलं असून, शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. या मागणीनंतर काही तासांतच दादा भुसेंनी स्पष्टीकरण शाळांच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलंय. दिपकेंच्या सूचनांचे स्वागतच करतो. काही शाळांमध्ये त्रुटी असतील हे आम्ही मान्य करतो, असं भुसे म्हणाले.

अभिजीत दिपके हे विविध शाळांना भेटी देत आहेत. शाळांतील ज्या काही गैरसोई आणि त्रुटी निदर्शनास आणून देत आहेत आणि ज्या सूचना करत आहेत, त्यांचे आम्ही स्वागतच करतो. काही शाळांमध्ये त्रुटी आणि दुरवस्था असतीलच. त्या आम्ही मान्य करतो. त्या सुधारण्याचा प्रयत्न देखील करतच आहोत, असे शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले.

राज्यभरात शिक्षण विभाग इतर काही शिक्षक, शैक्षणिक संस्था २४ तास ३६५ दिवस दर्जेदार शिक्षण देण्यासाठी मेहनत घेत आहेत. एक आदर्श विद्यार्थी घडावा, एक आदर्श राष्ट्रभक्त घडावा यासाठी शिक्षण विभाग अधिक मेहनत घेत आहे; तरी देखील दिपके असो अथवा इतर कोणीही, ज्या त्रुटी आमच्या निदर्शनास आणून दिल्या जातील, त्यावर योग्य ते काम केले जाईल. त्यांच्या सूचनांचे स्वागतच आहे, असा पुनरुच्चारही भुसेंनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

देवाभाऊंच्या घरी जरांगेभाऊ जाणार, अमृता फडणवीसांकडून जरांगेंना जेवणाचं आमंत्रण

SCROLL FOR NEXT