महाराष्ट्र

Cyclone Shakti: महाराष्ट्रात धडकणार मोठं संकट,पुढील 48 तास धोक्याचे

Cyclone Shakti IMD Alert: अरबी समुद्रावर शक्ती चक्रीवादळ तयार होत आहे आणि येत्या ४८ तासांत रत्नागिरी आणि कोकणसह महाराष्ट्राच्या किनारी जिल्ह्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

  • रत्नागिरीसह कोकण किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • पुढील ४८ तास धोकादायक असून चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

  • शेती, पिकं, नदीकिनारी भाग आणि किनारपट्टीवरील गावे यांना मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

राज्यात पावसामुळे मोठं नुकसान झालं. आता आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आलीय. शक्ती चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. यंदा महाराष्ट्राला पावसाचा मोठा तडाखा बसला.राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला. नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. निसर्गानं हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला.

अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळाचा धोका निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण किनारपट्टीवरील सर्वच जिल्ह्यांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पुढील ४८ तासांमध्ये या चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीय.

शक्ती चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे. सध्या तरी या चक्रीवादळाचा कुठलाही परिणाम हा कोकण किनारपट्टीवर झाल्याचं दिसून आले नाहीये. मात्र खोल समुद्रात वाऱ्याचा वेग ताशी ५० किमीपर्यंत राहण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय.चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी समुद्रात जाणं टाळत आहेत. हवामान खात्याकडून देखील मच्छिमारांना पुढील दोन ते तीन दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय.

खोल समुद्रात वादळाची परिस्थिती असल्याने मत्स्य विभाग देखील या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान चक्रीवादळामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढू शक्यतो. कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस होईल, अशी शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई- पुणे कनेक्टिव्हिटी बिघडली; एक्सप्रेसवेवर कोंडी नियोजनचं 'मिसिंग'

LPG Cylinder: महागाईच्या झळा, सामान्यांना 'कळा'! व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांनी महागला; खाद्यपदार्थांच्या किंमती वाढणार?

Pune Crime: गुरांच्या गोठ्यात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: राज्यातील १ कोटी ८९ लाख लाडक्या बहिणी पात्र; ५४ लाख बहिणींना नाही मिळणार १५०० रुपये

SCROLL FOR NEXT