nandgaon,  saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News : नांदगाव पोलिसांच्या हातावर तुरी देत संशयिताने ठाेकली धूम

या संशयित आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे.

Siddharth Latkar

- अजय साेनावणे

Nandgaon Crime News : नांदगाव तालुक्यातील नाग्या - साक्या धरणावरील (nagya sakya dam) कृषी पंपासाठी वापरल्या जाणाऱ्या केबल चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयित आरोपीने न्यायालयातून पोलीस ठाण्यात परतल्यानंतर पोलिसांची हातावर तुरी देवून धूम ठोकल्याची घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. हिरामण धोंडीबा गांगुर्डे असे या फरार झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. (Maharashtra News)

दरम्यान, संपूर्ण पोलीस स्थानक संशयित आरोपीच्या शोधात लागले आहे. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत हा संशयित आरोपी मिळून न आल्याने त्यास शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले.

याबाबत अधिक माहिती अशी की नाग्या - साक्या धरणातील कृषी पंपाच्या तांब्याच्या केबलची चोरी करणाऱ्या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ७ कृषीपंपाच्या ७४ हजार रुपयांच्या केबल चोरी प्रकरणी तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यातील दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २७ जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. काल हिरामण धोंडीबा गांगुर्डे या तिसऱ्या संशयिताला पाेलिसांनी ताब्यात घेतले होेते.

या संशयितास न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली होती. यास न्यायालयातून पोलीस ठाण्यात आणले असता आरोपीने पोलिसांची नजर चुकवून तेथून पळ काढला. काल रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यातील सर्वच अधिकारी कर्मचारी या संशयित आरोपींची शोधासाठी मागावर होते. मात्र तो मिळून न आल्याने पोलिसांसमोर या आरोपीला शोधण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

या संशयित आरोपीचा पोलिसांकडून (police) कसून शोध घेतला जात आहे. पोलिसांच्या ताब्यातून आरोपी पळून जाण्याची घटना प्रथमच घडल्याने शहरात याविषयी चांगलीच चर्चा रंगली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Gain Reasons: डाएट आणि एक्सरसाइज करूनही वजन वाढतंय? 'या' ७ चुका तुमचा प्रयत्न करू शकतात फेल

Central Railway News : दुष्काळात तेरावा महिना! मेगा ब्लॉक सुटल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल सेवा ४५ मिनिटे उशिराने

Maharashtra News Live Update: Mumbai: पुण्यात मराठा बिझनेस कम्युनिटीचा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो

Papaya vs Watermelon: पपई की कलिंगड? वजन, पचन आणि इम्युनिटीसाठी कोणतं फळ ठरेल बेस्ट

अजब कारभार! ६० वर्षांनंतर कल्याणमधील पद्मिनी प्रीमिअरची होणार SIT चौकशी, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT