Cryptocurrency Scams Saam Digital
महाराष्ट्र

Cryptocurrency Scams: १०० दिवसांत पैसे दुप्पट... मोठमोठी आमिषं, सोलापूरकरांची लाखो रुपयांची फसवणूक

Cryptocurrency Scams: सोलापुरात शिवाजी महाराजांच्या नावे असलेल्या क्रिप्टो करन्सीच्या नावावर फसवणूक करण्यात आली आहे. मोठमोठी आमिषं आणि अल्पावधीत पैसे दुप्पट करण्यासाठी लोकांनी गुंतवणूक केली होती.

Sandeep Gawade

विश्वभूषण लिमये

Cryptocurrency Scams

सोलापुरात शिवाजी महाराजांच्या नावे असलेल्या क्रिप्टो करन्सीच्या नावावर फसवणूक करण्यात आली आहे. मोठमोठी आमिषं आणि अल्पावधीत पैसे दुप्पट करण्यासाठी लोकांनी गुंतवणूक केली होती. यातून लाखो रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या सोलापूरकरांची फसवणूक झाली असून पुण्यातील सोनीटीक्स नावाच्या कंपनीने अँपद्वारे लाखो रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे शिववर्स कॉइनद्वारे फसवणूक झाली आहे. सोलापूरसह लोणावळा, परभणी, कोल्हापूर, गोवा, पुणे अशा अनेक मोठ्या शहरात कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यातून मोठमोठया आमिषांना गुंतवणुकदार बळी पडले आहेत. मर्सिडीज , बीएमडब्ल्यू, फॉर्च्युनर, ब्रिझा अशा अनेक मोठ्या गाड्यांचे आमिष. तसेच शंभर दिवसात पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. दरम्यान फसवणूक झाल्याची समजताच गुंतवणूकदारांनी सोलापूर शहर पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान शिवरायांच्या नावावर फसवणूक करणाऱ्या कंपनीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राम जाधव यांनी केली आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऑनलाईन हॉटेल बुकिंग पडलं महागात

उच्चशिक्षित तरुणीला ख्रिसमसनिमित्त महाबळेश्वरला जायचं होतं. त्यासाठी तिला हॉटेलची गरज होती. त्यामुळे तिने ऑनलाईन माहिती घेत हॉटेलमध्ये रूम घेण्याचे निश्चित केले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तरुणीच्या मोबाईलवर संपर्क साधत हॉटेलचे कर्मचारी बोलत असल्याचे सांगून बँक खात्याची माहिती घेतली. तरुणीच्या खात्यातून परस्पर तीन लाख पाच हजार रुपये लंपास केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरुणीनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सायबर क्राईम अंतर्गत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून लोणीकंद पोलीस स्थानकाचे पोलीस अधिक तपास करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT