कोरोनासोबत डेंगू, चिकुनगुनीया सारख्या आजारांचे प्रमाण वाढले; दवाखान्यात रुग्णांची गर्दी Saam TV
महाराष्ट्र

कोरोनासोबत डेंगू, चिकुनगुनीया सारख्या आजारांचे प्रमाण वाढले; दवाखान्यात रुग्णांची गर्दी

आधीच कोरोनाची भीती अशातच आता मलेरिया, गॅस्ट्रो , डेंगू, कावीळ व चिकनगुनीया सोबत सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, व डोकेदुखी यांचा त्रास होत असल्याने नागरिक खाजगी व जिल्हा रुग्णालयात गर्दी करत आहेत.

राजेश काटकर

परभणी : कोरोना रुग्णांची (Corona patient) संख्या परभणी जिल्हात झपाट्याने वाढत आहे. अशातच आता कोरोनासोबत इतर साथीच्या आजारांनी देखील डोकं वर काढलं आहे. मलेरिया, चिकनगुनीयासह अन्य किरकोळ आजारांचे प्रमाण वाढल्याने सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

वृध्द व लहानमुलांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आहे. जिल्ह्यात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच कोरोना (Corona) रुग्ण वाढत आहेत. त्यातच डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यत शहरात डेंगूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात होते. त्यानंतर हे रुग्ण हळूहळू कमी झाले मात्र सध्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे आधीच कोरोनाची भीती अशातच आता मलेरिया, गॅस्ट्रो , डेंगू, कावीळ व चिकनगुनीया सोबत सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, व डोकेदुखी यांचा त्रास होत असल्याने नागरिक खाजगी व जिल्हा रुग्णालयात गर्दी करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकरी पात्र, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

SCROLL FOR NEXT