Nanded: महाविद्यालयातील वादातून मागासवर्गीयांच्या वस्तीवर जमावाचा हल्ला...(पहा व्हिडिओ) संतोष जोशी
महाराष्ट्र

Nanded: महाविद्यालयातील वादातून मागासवर्गीयांच्या वस्तीवर जमावाचा हल्ला...(पहा व्हिडिओ)

महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून मागासवर्गीयांवर हल्ले होत असल्याच्या घटना घडताना समोर येत आहे.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड: महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून मागासवर्गीयांवर हल्ले होत असल्याच्या घटना घडताना समोर येत आहे. आता, नांदेडमध्ये (Nanded) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यामधील (district) अर्धापूर तालुक्यातील लहान गावात (village) महाविद्यालयीन (College) वादातून मागासवर्गीयांच्या वस्तीवर जमावाने हल्ला (Attack) केला आहे. जवळपास २०० ते ३०० लोकांच्या जमावाने हा हल्ला केला असल्याचे सांगितले जात आहे. (Crowd attack backward class settlement due college dispute)

पहा व्हिडिओ-

महाविद्यालयामधील अंतर्गत वादाचे पडसाद या वस्तीवर झाल्याची माहिती अतिरिक्त पोलीस (Police) अधीक्षक विजय काबाडे यांनी यावेळी दिली आहे. सोमवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास हा हल्ला झाला आहे. हल्लेखोर जमावाने अनेक घरांवर तुफान दगडफेक (Stone throwing) करत तोडफोड केली आहे. शिवाय, वस्तीत महिला, वृद्ध, लहान मुले यांना देखील मारहाण (Beating) करण्यात आली आहे. गावातील महाविद्यालयीन तरुणांच्या भांडणाचे रूपांतर नंतर मागासवर्गीय वस्तीवर दगडफेक करण्यात आली आहे.

या हल्ल्यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांना (police) या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी या हल्ल्या प्रकरणी हल्लेखोरांविरोधामध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान, मराठवाड्यात (Marathwada) गेल्या काही दिवसांमध्ये सामाजिक भेदभाव, अत्याचाराच्या घटना समोर आले होते.

हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात सावरखेडा गावामध्ये गायरान जमिनीवर निळा झेंडा लावल्याच्या कारणावरून अनुसूचित जातींच्या समाजावर संपूर्ण गावाने बहिष्कार टाकला आहे. गावात महिला सरपंचाचे दीर भागवत मुंडे यांनी एक जानेवारीत बैठक घेऊन संपूर्ण सवर्ण समाजाच्या वतीने दलितांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हापासून आजपर्यंत दलित समाजात नागरिकांना पिठाच्या गिरणीवर दळून दिले जात नाही. शिवाय किराणा दुकानदार बाजार देत नसल्याची तक्रार समोर आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT