भाजपवाले औकात नसताना आपली तुलना मोठ्या लोकांशी करतात; बच्चू कडूंचा घणाघात SaamTV
महाराष्ट्र

भाजपवाले औकात नसताना आपली तुलना मोठ्या लोकांशी करतात; बच्चू कडूंचा घणाघात

चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरती बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली; यावेळी त्य़ांनी भाजप आणि पाटील यांच्यावरती जोरदार टीका केली.

अभिजित घोरमारे

भंडारा : बहुसंख्य OBC समाजाला डावलून स्थानिक स्वराज्य संस्थेची होत असलेली निवडणूक अन्यायकारक असल्याचे वक्तव्य आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनी केले आहे. ते आज भंडाऱ्यात (Bhandara) पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

पहा व्हिडीओ -

तसंच ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणूक न घेण्याचा जो ठराव राज्य सरकारने मांडलेला आहे तो योग्य असल्याचा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला. शिवाय या निर्णयाला आपला पाठिंबा असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान चंद्रकांत पाटलांच्या (Chandrakant Patil) त्या वादग्रस्त वक्तव्यावरती बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, 'भाजपवाले औकात नसताना सुद्धा आपली तुलना रामांशी करू शकतात शिवाजी महाराजांशी करू शकतात, मात्र कोणत्याही मोठ्या लोकांशी तुला केल्याने माणूस मोठा होत नाही. असं आमदार बच्चू कडू (Bacchu kadu) म्हणाले. तसंच शिवाजी महाराजांची (Shivaji Maharaj) तुलना इतर कोणाशी करणाऱ्या व्यक्तीचा आम्ही निषेध करत असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लिफ्टमध्येच बॉयफ्रेंडसोबत इंटिमेट झाली, KISS करतानाचा व्हिडिओ व्हायरल, मुंबईतील महिलेसोबत नेमकं काय घडलं?

Viral Video: होणाऱ्या नवऱ्याला पाहताच मंडपात नवरीच्या अश्रूंचा पूर; लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Motyacha Bangdya Designs : नऊवारी अन् पैठणीवर शोभून दिसतील मोत्याच्या बांगड्या, 'या' लेटेस्ट सुंदर डिझाइन्स एकदा पाहाच

Maharashtra Live News Update : कल्याणमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या, ९ वर्षांच्या मुलासमोरच घडला थरार

Rain Alert : महाराष्ट्रात उन्हाळा की पावसाळा? २ दिवस कुठे अवकाळी पावसाचा इशारा, तर कुठे कडाक्याच्या उन्हाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT