Chhatrapati Sambhaji Nagar Saam TV
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : परीक्षेत एका विद्यार्थ्याचा दुसऱ्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; खळबळजनक घटनेनं शिक्षकही हादरले

Knife attack on student : शालेय विद्यार्थ्यांबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर शहरात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. आता शालेय विद्यार्थ्यांबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेत परिक्षेच्यावेळी एक विद्यार्थी थेट चाकू घेऊन आला होता. इतकेच नाही तर या विद्यार्थ्याने थेट दुसऱ्या एका विद्यार्थ्यावर चाकून वार केला आहे. (School Students)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या नागरी या गावात भर परीक्षेत एका विद्यार्थ्यावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एक विद्यार्थी पर्यवेक्षकांना अडचण विचारत असताना दुसऱ्या विद्यार्थ्याने थेट स्वतःसोबत आणलेला चाकू काढून विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला केला. यावेळी वार विद्यार्थ्याने चुकवल्यामुळे त्याच्या पाठीवरती वार झाला आहे.

या घटनेत विद्यार्थाला मोठी जखम सुद्धा झाली आहे. या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून झालेल्या प्रकारामुळे परीक्षा मात्र विस्कळीत झाली होती. सागर खेडकर असं या प्रकरणात जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून अमोल गायकवाड असं चाकू हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्यांचा नाव आहे.

मुलगा पाहिजे म्हणत प्राध्यापकाचा विद्यार्थीनीवर अत्याचार

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका प्राध्यापकाने गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासल्याची घटना समोर आली आहे. आम्हाला दोन मुली आहेत, आता मुलगा पाहिजे असे म्हणत एका प्राध्यापकाने विद्यार्थीनीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या प्रध्यपकाच्याबायकोनेही मला हे मान्य असल्याचे म्हटले आहे. या संतापजनक प्रकारामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) खळबळ उडाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागातील हा प्राध्यापक असून त्याने मुलगा पाहिजे म्हणत विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे त्याच्या पत्नीने देखील तिला हे सर्व मान्य असल्याचे सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरा बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar : पुराच्या पाण्यात कच्चा पूल गेला वाहून; प्रसूतीनंतर एक दिवसाच्या बाळाला घेत गुडघाभर पाण्यातून महिलेचा प्रवास

Maharashtra Live News Update: पुण्यात वर्षभरात वाढला 748 मिमी पाऊस

Russia Earthquake: भूकंपामुळे हॉस्पिटल हादरले, ऑपरेशन सुरू असताना बेड, टेबल हालू लागले; तरीही डॉक्टरांनी..., पाहा थरारक VIDEO

Vidula Chougule: चटकचांदणी चतुर कामिनी, काय म्हणू तुला तू आहेस तरी कोण?

iPhone 15: आयफोन १५ वर मोठी सूट! अमेझॉन फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये मिळेल फक्त 'या' किमतीत

SCROLL FOR NEXT