Gondia Crime News Saam TV
महाराष्ट्र

Gondia News : जावयानेच पेटवलं सासऱ्याचं घर, दोन मोटर सायकल जळून खाक; गोंदियातील घटना

Gondia Crime News : गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील डवकी गावात ही घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

शुभम देशमुख

Gondia News :

गोंदियामध्ये लाडाच्या जावयाने सासरच्या घरालाच आग लावल्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील डवकी गावात ही घटना घडली आहे.

जावयाने लावलेल्या आगीत दोन मोटरसायकल जळून खाक झाल्या आहेत, तर आगीत घराचेही छत जळाले. डवकी येथील शंकर राऊत आणि परिवारातील सदस्य हे रात्री झोपले होते. दरम्यान रात्री १ वाजता घराबाहेर अचानक स्फोट झाल्याचा आवाज आला. (Latest Marathi News)

आवाज येताच शंकर राऊत हे घराबाहेर आले. त्यावेळी त्यांच्या घरासमोर ठेवलेल्या दोन मोटरसायकल आणि घराच्या समोरील छतास आग लागल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी लगेच आरडाओरडा करुन लोकांना जमा केले. (Political News)

परिसरातील नागरिक मदतील धावून आले आणि तातडीने त्यांनी आग विझवली. दरम्यान जावई नितेश मधुकर शहारे हा बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन उभा असल्याचे निदर्शनास आले. लोकांना पाहताच त्याने तिथून पळ काढला. या घटनेची देवरी पोलीस स्टेशन येथे तक्रार करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Safe Dating Tips: डेटिंग अ‍ॅपवर भेटलेल्या व्यक्तीसोबत डेटला जाताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा

PF: नोकरी बदलली? PF अकाउंट कसं ट्रान्सफर करायचं? ऑनलाइन स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

Sangli Rain : कृष्णा आणि वारणा नदीवरील १६ बंधारे पाण्याखाली; शेतांमध्ये साचले पाणी

Realme 15 आणि 15 pro सिरीजची एंट्री! जाणून घ्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये काय आहे खास

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

SCROLL FOR NEXT