Akola Crime News Saam TV
महाराष्ट्र

Crime News: धक्कादायक! अल्पवयीन मुलानेच बापाला संपवले; अकोल्यात घडलेल्या घटनेने खळबळ

व्यसनाधीन बापाच्या त्रासाला कंटाळून मुलाने वडिलांचीच हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. या धक्कादायक बातमीने परिसरात खळबळ माजली आहे.

जयेश गावंडे

Akola News: व्यसनाधीन बापाच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलाने आपल्या बापाची हत्या केल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील गीता नगर भागात घडली आहे. सुनील शिकारी अस मृत व्यक्तीचं नाव असून, या धक्कादायक बातमीने परिसरात खळबळ माजली आहे. (Akola News)

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील शिकारी हे आपल्या परिवारासह अकोल्यात राहत होते. त्यांचा परिवार हा छत्तीसगडहून अकोल्यात झाडू तयार करून विक्री करण्याचे काम करत होता.

काल रात्री या परिवारात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आज सुद्धा पुन्हा वाद झाला. याच वादातून संतप्त मुलाने रागाच्या भरात वडिलांवर चाकूने वार केले. या हल्ल्यात सुनील शिकारी यांचा मृत्यू झाला.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी मारेकरी मुलाला आणि त्याच्या आईला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. मुलाच्या आईची या घटनेत काय भूमिका आहे, हे अजूनही स्पष्ट झाले नाही. जुने शहर पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT