Crime News Saam TV
महाराष्ट्र

Crime News: धक्कादायक! जन्मदात्या बापानेच केली पोटच्या मुलाची गळा चिरुन हत्या, मृतदेह झोळीत नेतानाच...

हत्येनंतर मुलाचा मृतदेह एका झोळीत घेऊन नाल्यात फेकण्यासाठी तो घेऊन जात असताना स्थानिकांनी पाहिले, आणि हा सर्व प्रकार उघड झाला. (Crime News)

अजय दुधाणे

Amabarnath: अंबरनाथमध्ये निर्दयी बापानेच ११ वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर मुलाचा मृतदेह नाल्यात फेकत असताना नागरिकांनी या नराधमाला पकडून पोलिसांच्या हवाली केले.या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, अंबरनाथमध्ये राहणाऱ्या आनंद गणेशन या युवकाने बुधवारी त्याच्या ११ वर्षीय मुलगा आकाश याची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्येनंतर मुलाचा मृतदेह एका झोळीत घेऊन नाल्यात फेकण्यासाठी तो घेऊन गेला.

मात्र याचवेळी काही स्थानिकांनी त्याला बघितले आणि पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नराधम बापाला बेड्या ठोकल्या. पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त अशा बड्या अधिकाऱ्यांनी सुद्धा घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

कौटुंबिक वादातून हत्या?

कौटुंबिक वादातून वडिलांनी मुलाची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी आनंद गणेशन यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. तसेच त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती अंबरनाथ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी दिली आहे.

दरम्यान, बापानेच पोटच्या मुलाची हत्या केल्याच्या या धक्कादायक बातमीने परिसरात खळबळ माजली आहे. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोडिंगच्या जोरावर PMPMLचं बनावट ॲप! फुकट प्रवासासाठी 20 वर्षीय विद्यार्थ्याचा प्रताप उघड

Maharashtra News Live Update: नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान आणि मतमोजणी कधी? जाणून घ्या

Bridal Beauty Kit: लग्नानंतर नव्या नवरीच्या बॅगेत असायलाच हव्यात 'या' ७ गोष्टी, कधीही ठरतील फायदेशीर

Cabinet Meeting: दिल्ली-मुंबई-कोलकाता-चेन्नई कनेक्टिव्हिटीला बूस्ट; 7 हाय-डेन्सिटी कॉरिडॉरचा होणार विस्तार, रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल!

SCROLL FOR NEXT