Sangli Crime News Saam TV
महाराष्ट्र

Sangli Crime News: सांगली हादरली! अल्पवयीन मुलीचं भररस्त्यात अपहरण, अत्याचार करत धारदार शस्त्राने वार

Crime News: पीडिता रस्त्याने जात असताना रिक्षातून तिचे अपहरण करण्यात आले.

Ruchika Jadhav

Sangli Crime News: सांगलीमध्ये काळजात धडकी भरवणारी एक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला मिरज येथे आणून तिच्यावर अत्याचार करण्यात आलाय. इतकेच नाही तर नराधमाने तिचा गळा चिरून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.(Latest Crime News)

प्रसाद (वय 20) राहणार ब्राह्मणपुरी मिरज या नराधमावर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पीडिता रस्त्याने जात असताना रिक्षातून तिचे अपहरण करण्यात आले. तसेच मिरजेतील एका ठिकाणी तिच्यावर अत्याचार करून तिच्या गळ्यावर कटरने वार करत तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

सदर अल्पवयीन पीडित मुलगी गंभीर जखमी झाली आहे. पीडित मुलीला नातेवाईकांनी उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलध्ये दाखल केले आहे. सांगली शहर पोलिसात नराधम प्रसाद मोतुगडे माळी याच्याविरोधात अपहरण पोक्सो ॲट्रॉसिटी आणि अत्याचार तसेच खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिलडा हे करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh: 'प्रिय अजित दादा, अजूनही महाराष्ट्र...'; बिग बॉस मराठीच्या मंचावर रितेश देशमुख झाला भावुक, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहणं आमची जबाबदारी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Union Budget 2026: अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी घोषणा, सुरु केली नवीन योजना; फायदा काय?

Budget 2026: रिवाइज्ड ITRसाठी मुदतवाढ; नवीन प्राप्तिकर कायदा कधीपासून होणार लागू?

Rohit Shetty House Firing: रोहित शेट्टी हल्ला प्रकरणाला नवे वळण; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी थेट कनेक्शन

SCROLL FOR NEXT