मनोहर भोसलेंसह तिघांवर बारामतीत गुन्हा दाखल! Saam Tv
महाराष्ट्र

Breaking : मनोहर भोसलेंसह तिघांवर बारामतीत गुन्हा दाखल! पहा VIDEO

मनोहर भोसले यांनी बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत फिर्यादीच्या वडीलांचा कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला असल्याचे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.

मंगेश कचरे

बारामती : बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर मामा भोसले यांच्यासह दोन अन्य साथीदारांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओंकार शिंदे अशी मनोहर मामासोबत गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बारामतीतील रहिवासी असलेले शशिकांत खरात यांनी या प्रकरणात बारामती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

20 ऑगस्ट 2018 ते 31 ऑगस्ट 2021 या दरम्यान हा गुन्हा घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मनोहर भोसले यांनी बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत फिर्यादीच्या वडीलांचा कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला. विशाल वाघमारे, ओंकार शिंदे यांच्याशी संगनमत करत वडीलांच्या व फिर्यादीच्या जिविताची भिती घालून फिर्यादीकडून वेळोवेळी 2 लाख 51 हजार रुपये घेत फसवणूक केली.

पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे शशिकांत खरात यांनी सांगितले आहे. याप्रकरणी तिघांवर फसवणूकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. फसवणूक झालेल्यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care: जेवल्यानंतर या ७ चुका केल्याने वजन कधीच कमी होतं नाही, तुम्हीही करताय का चुका?

Maharashtra Live News Update : साताऱ्यात मुसळधार पावसासह गारांचा पाऊस; रानगेघर, करंदी परिसरात गहू-ज्वारीचे नुकसान

Tadgola Benefits: कडाक्याच्या उन्हात ताडगोळे खाल्याने कोणकोणते फायदे होतात, ही माहिती एकदा वाचाच

Mumbai news: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

SCROLL FOR NEXT