कुख्यात गुंड सुरेश पुजारी SaamTvNews
महाराष्ट्र

Crime Breaking : कुख्यात गुंड सुरेश पुजारीला 10 दिवसांची पोलीस कोठडी!

कुख्यात गुंड सुरेश पुजारी याला फिलिपिन्स येथे अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला एटीएसच्या ताब्यात दिले.

विकास काटे, ठाणे

पुणे : कुख्यात गुंड सुरेश पुजारी याला फिलिपिन्स (Philippines) येथे अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला एटीएसच्या (ATS) ताब्यात दिले. त्यानंतर एटीएसने त्याला आज ठाणे (Thane) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सुनावणीदरम्यान कुख्यात गुंड सुरेश पुजारी याला 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

कुख्यात गुंड सुरेश पुजारी याला फिलीपिन्स येथे अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. कल्याण खंडणी प्रकरणी एटीएसने सुरेश पुजारी याला दिल्ली पोलिसांकडून ताब्यात घेऊन आज त्याला ठाणे न्यायालयात हजर केले होते.

हे देखील पहा :

न्यायालयाने (Court) सुरेश पुजारीला 25 डिसेंबरपर्यंत 10 दिवसांची पोलीस (police) कोठडी सुनावली आहे. सुरेश पुजारी (Suresh Pujari) याच्यावर कल्याणमधील महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या अंतर्गत धमकी आणि खंडणीचा गुन्हा दाखल होता. 19 जुलै 2021 ला सुरेश पुजारी याने के के वाईन्सचे मालक रोहित जेठाणी आणि त्यांचा भावाला धमकी देत 50 लाखांची खंडणी मागितली होती.

याप्रकरणी जेठाणी कुटुंबीयांनी ठाणे एटीएसमध्ये धाव घेत तक्रार केली होती. खंडणी आणि धमकावणे अशा प्रकारचे अनेक गुन्हे सुरेश पुजारी याच्यावर याआधी देखील दाखल आहेत. कल्याण के के वाईन्स खंडणी प्रकरणात सुरेश पुजारी याच्यासोबत आणखी कोण सहभागी होते? आणि सुरेश पुजारी याने आणखी किती लोकांकडून खंडणी मागितली? याचा तपास एटीएस करणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT