5 वर्षापूर्वीचा गुन्हा; 3 सख्ख्या भावांना आता जन्मठेप...  Saam Tv
महाराष्ट्र

5 वर्षापूर्वीचा गुन्हा; 3 सख्ख्या भावांना आता जन्मठेप...

बोरखळ येथे शेतात शेळ्या घुसल्याच्या किरकोळ कारणातून झालेल्या वादावादीत एकाचा खून करणाऱ्या 3 सख्ख्या भावांना सातारा कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

ओंकार कदम

सातारा : तालुक्यातील बोरखळ या ठिकाणी भरदिवसा 3 सख्ख्या भावांनी चाकू, लोखंडी पाईप, लाकडी दांडके याने एकाला मारहाण करत खून केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.एल. मोरे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शेतात चुकून शेळ्या गेल्याच्या रागातून झालेल्या वादावादीत ही घटना घडली होती. रुपेश रसाळ, हेमंत रसाळ, सूरज रसाळ तिघे रा.बोरखळ अशी आरोपींची नावे आहेत.

हे देखील पहा-

राजेश नामदेव पाटील (वय- 40) रा.बोरखळ असे खून झालेल्याचे नाव असून याप्रकरणी मच्छिंद्र नारायण पाटील (वय- 48) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली होती. तक्रारदार मच्छिंद्र पाटील हे 28 जून 2016 रोजी दुपारी 2.30 वाजता बोरखळ मधील कोळकीचा माथा या ठिकाणी शेळ्या चरत होते. त्यावेळी त्यांच्या शेळ्या संजय रसाळ यांच्या मालकीच्या भुईमुगाच्या शेतात गेल्या होते.

शेतात शेळ्या गेल्याच्या कारणातून पाटील रसाळ यांच्यामध्ये वाद झाला. आणि त्यातून पाटील यांना काठीने मारहाण झाली होती. या वादानंतर मच्छिंद्र पाटील घरी जात असताना त्यांचा पुतण्या राजेश पाटील यांना भेटला असता मारहाण झाल्याचे त्यांना समजले. यामुळे पाटील कुटुंबिय मारहाणीबाबतचा जाब विचारण्यासाठी रसाळ यांच्याकडे गेले होते. याचवेळी चौकात संशयितांनी हत्यारासह राजेश पाटील यांच्यावर हल्ला चढवला.

या हल्ल्यात राजेश यांच्या पाठीवर, पोटावर वार झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर न्यायालयात दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायाधिशांनी तिन्ही भावांना जन्मठेप आणि प्रत्येकी 5 हजार रुपये दंड ठोठावला आहे. तो दंड न भरल्यास 3 महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.मिलिंद ओक यांनी काम पाहिले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT