eknath shinde  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : अमित शहांनी शिंदेंनाच सुनावलं? संजय राऊत यांनी फोडलं दोघांच्या भेटीचं गुपित, VIDEO

Sanjay Raut News : महायुतीतील धुसफूस थेट केंद्रीय मंत्री अमित शाहांच्या दारी गेली.. मात्र शाहांनीच शिंदेंना सुनावल्याचं समोर आलंय.. मात्र हा दावा कुणी केलाय? आणि महायुतीत कोणत्या मुद्द्यावर धुसफूस सुरु आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये....

Bharat Mohalkar

महायुती सरकारमध्ये पालकमंत्रिपद, निधीवाटप, फाईल्सची अडवणूक यावरुन धुसफूस सुरुच आहे.. त्या पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट अमित शाहांपुढे अजित पवारांच्या तक्रारींचा पाढा वाचलाय.. मात्र या तक्रारीनंतर शाहांनी शिंदेंनाच सुनावल्याचा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय.

अमित शहांचं वक्तव्य राज्याचं चित्र स्पष्ट करणारं, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. महायुतीचं सरकार आल्यापासून महायुतीत शह-काटशहाचं राजकारण रंगलंय. त्यातच रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिल्याने हा वाद चव्हाट्यावर आला.. तर सत्तेतील दुसऱ्या क्रमांकासाठीही हा संघर्ष कायम आहे.. त्यातच गेल्या काही दिवसांपासून महायुतीत शिंदे गटाची कोंडी करण्याचं काम सुरु आहे.. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सरकारमध्ये झुकतं माप दिलं जात असल्याची चर्चा आहे..मात्र सुत्रांच्या माहितीनुसार महायुतीत अंतर्गत संघर्ष कसा सुरु आहे? पाहूयात....

महायुतीत शिंदेंची कोंडी?

शिंदे गटाच्या फाईली दादांनी रोखल्याची चर्चा

रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन शिंदे-दादांमध्ये रस्सीखेच

शिंदे गटाला निधी वाटपात सापत्न वागणूक

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नाईकांचा जनता दरबार

आधी रायगडावर आणि नंतर चैत्यभूमीवर अजित पवारांचं भाषण वगळण्यात आलं... तर चैत्यभूमीवर शिंदेंनाही संधी दिली नाही.. . त्यातच शाहांनीही लाडक्या शिंदेंना सुनावल्याची चर्चा रंगल्याने भाजप शिंदेंना दूर लोटण्याचा प्रयत्न करत आहे का? याचीही चर्चा रंगलीय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Traffic Diversions News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीत आज मोठा बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Ahilyanagar : जातीची बंधने झुगारत अंध शिवाजी आणि आशाने बांधली लग्नगाठ; सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून अनोखा रिसेप्शन सोहळा

Nilesh Sable: 'डॉक्टर ते ॲक्टर' निलेश साबळेविषयी या गोष्टी कोणालाच माहित नाही

Beed: सामाजिक कार्यकर्त्याचा प्रताप; जिल्हा परिषदेच्या कार्यालयात गेला, महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करत...

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

SCROLL FOR NEXT