lockdown news 
महाराष्ट्र

सात गावांना काेराेनाचा विळखा; प्रशासनाचा लाॅकाडउनचा निर्णय

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील सात गावांमध्ये दहा पेक्षा अधिक काेराेनाचे रुग्ण वाढल्याने या गावांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. काेविड १९ ची साखळी ताेडण्यासाठी यापुर्वी पंढरपूर pandharpur lockdown news जिल्हा प्रशासनाने २१ गावांत निर्बंध लागू केले हाेते. आता नव्याने सात गावांचा समावेश झाल्याने एकूण २८ गावांत हे निर्बंध लागू राहणार आहेत.

प्रांताधिकारी गजानन गुरव म्हणाले कोरोना बाधितांची रुग्ण संख्या अटाेक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यापूर्वी पंढरपूर तालुक्यातील २१ गावांत संचारबंदी लागू केली आहे. त्याची अमंलबजावणी याेग्य पद्धतीने सुरु आहे. आता तालुक्यातील सात गावांना काेराेनाचा विळखा पडला आहे. येथे दहा पेक्षा अधिक रुग्ण संख्या वाढू लागली आहे. ही संख्या आटाेक्यात आणण्यासाठी निर्बंध लागू केले आहेत.

त्यानूसार वाखरी, तिसंगी, शेळवे, सोनके, सिध्देवाडी, कान्हापुरी, पिराची कुरोली या सात गावांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बाधितांनी त्यांच्या संपर्कातील लाेकांची तपासणी करुन घेणे, जे बाधित नाहीत परंतु ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही अशा नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन प्रांताधिकारी गुरव यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्र हादरला! उपचाराच्या बहाण्याने २० वर्षीय तरुणीचा विनयभंग; ठाकरेंच्या शिवसैनिकांनी डॉक्टरला बदडला, आरोपी गजाआड

Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

गणेशोत्सवाच्या तोंडावर सर्वसामान्यांना झटका! LPG सिलेंडर महागला, तुमच्या शहरात आज काय भाव?

Tuesday Horoscope: पैसा, करिअर आणि कुटुंब... या ५ राशींचं नशीब चमकणार! वाचा मंगळवारचे राशीभविष्य

अंबाजोगाईतील मॅरेथॉनपटूची राज्यभरात चर्चा; लेकीच्या शिक्षणासाठी आईची अनवाणी धाव

SCROLL FOR NEXT