shivamurthy muruga saam tv
महाराष्ट्र

Shivamurthy Muruga : लैंगिक शोषण प्रकरण; संत शिवमूर्ती मुरुगांना अटक, जामीन मंजूर

त्याचबरोबर या घटनेला वाचा फोडणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या अधिकाऱ्यांना सोमवारी पोलीस ठाण्यात प्रवेश दिला नसल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे.

विश्वभूषण लिमये

shivamurthy muruga : कर्नाटकातील लिंगायत समाजाचे प्रख्यात संत शिवमूर्ती मुरुगा यांच्यावर बलात्काराचे आरोप करण्यात आले आहेत. संत शिवमूर्ती यांनी आपल्या मठाद्वारे चालवण्यात येणाऱ्या वसतिगृहातील दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. मागील अनेक दिवसांपासून पीडित मुलींचं लैंगिक शोषण केलं जात होतं असा आरोप एका स्वयंसेवी संस्थेनं केला आहे. पीडित मुलींच्या जबाबानंतर संत शिवमूर्ती मुरुगा यांच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (posco) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी शिवमूर्ती यांना अटक केल्याची माहितीही मिळाली. मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांत त्यांना जामीन देण्यात आल्याचं समजत आहे. या प्रकरणी पोलिसांनी (police) संशयित आरोपी संत शिवमूर्ती मुरुगा यांच्यावर कठोर कारवाई करावी यासाठी कर्नाटकातील (karnataka) चित्रदुर्गा येथे निदर्शने सुरू झाली आहेत.

दोन अल्पवयीन मुलींनी तक्रार दिल्यानंतर म्हैसूर शहर पोलिसांनी शिवमूर्ती मुरुगा यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. त्यांच्यावर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. साेमवारी सायंकाळी वैद्यकीय चाचण्या पूर्ण होऊनही पोलिसांनी ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्याचबरोबर या घटनेला वाचा फोडणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या अधिकाऱ्यांना सोमवारी पोलीस ठाण्यात प्रवेश दिला नसल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात दोन महिन्यांत स्वाईन फ्लूचे ६२६ रुग्ण

Weight Loss : वजन घटवायचं असेल तर रात्री 'या' ५ पदार्थांना करा बाय-बाय, आठवड्याभरात दिसेल फरक

BP Medicines: BP नॉर्मल आला म्हणून गोळी बंद केली? ठरू शकतं महागात; डॉक्टरांनी सांगितलं हार्ट अटॅकचा धोका वाढतो

Navratri 2026 : दुष्काळामुळे महाराष्ट्रात दांडिया रद्द? मराठी एकीकरण समितीची मागणी

Plane Crash: उड्डाण घेताच लष्कराचे विमान कोसळलं, ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT