kolhapur, kolhapur collector office, court order saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Collector Office News : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची नामुष्की; जाणून घ्या प्रकरण

सन 1984 पासून न्यायालयात खटला सुरु हाेता.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर (kolhapur collector office latest news) जप्तीच्या कारवाईची नामुष्कीची वेळ आली आहे. न्यायालयाने (court) केलेल्या आदेशानूसार खुर्च्या, लॅपटॉप, वाहन जप्त करण्याच्या कार्यवाहीसाठी अधिकारी व वकील देवराज मगदूम (advocate devraj magdum) जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. (Breaking Marathi News)

कुरुंदवाड येथील विकास आराखड्यासाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठीचा दावा न्यायालयात दाखल हाेता. हा दावा कुरुंदवाड येथील वसंत संकपाळ यांनी दाखल केला हाेता. कुरुंदवाड येथील रस्त्यासाठी (kolhapur) जिल्हा प्रशासनाने संकपाळ यांची जमीन घेतली होती.

जमिनीच्या बदल्यात कुठलाही मोबदला न दिल्याने संकपाळ यांनी न्यायालयाचे सन 1984 मध्ये दरवाजे ठाेठावले हाेते. दरम्यान प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याने न्यायालयाने नुकसान भरपाई म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीचे काढले आहे अशी माहिती संकपाळ यांनी दिली.

जप्तीसाठी अधिकारी दाखल

आज संकपाळ यांचे वकीलांनी न्यायालयाच्या आदेशासह कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. खूर्च्या, लॅपटॉप, वाहन जप्त करावे असे न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानूसार ही जप्तीची प्रक्रिया राबवण्यासाठी अधिकारी आणि वकील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचा घात की अपघात?'६ जणांचा मृत्यू,मग प्रत्यक्षात ५ बॉडीच का?' आमदाराच्या मनात शंकांचं काहूर

लग्नाच्या पहिल्या रात्री चुकूनही या ५ गोष्टी करू नका; अन्यथा...

कमळ-धनुष्यबाणालाचा निधी मिळणार; मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य, VIDEO

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ऐन निवडणुकीत शिवसेनेला खिंडार, बड्या नेत्याचा पक्षाला 'जय महाराष्ट्र '

पैसे सुट्टे देणे-घेण्यावरून वाद टोकाला गेला; ग्राहक आणि रिक्षाचालकामध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO

SCROLL FOR NEXT