court order saam tv
महाराष्ट्र

वाळू तस्करी प्रकरणात आटपाडीतील चाैघे दाेषी; ६ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा

श्री. शेळके यांनी त्याची तक्रार पोलिस ठाण्यात केली हाेती.

विजय पाटील

सांगली : सांगली (sangli) जिल्ह्यात वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याच बरोबर वाळू तस्करी करताना कारवाई करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या आटपाडीतील (atpadi) संशयित आरोपींना सहा महिने सक्तमजुरी आणि सोळाशे रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (court) यांनी ठाेठावली आहे. (atpadi latest marathi news)

अक्षय दादा लव्हटे, चैतन्य उर्फ दादा लक्ष्मण भागवत, राजेंद्र उर्फ राजू मोहिते, संतोष पुजारी असे शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. सन २०१७ कालावधीत त्यांनी बोंबेवाडी ते पांढरेवाडी रस्त्यावरील कोळेकर माळ येथील ओढ्यावरील पुलाजवळ वाळू उपसा करून त्याची दोन ट्रॅक्टर ट्रॉलीत भरून वाहतूक करीत होते. त्यावेळी तहसील कार्यालय आटपाडी येथे कार्यरत सुरेश किसन शेळके हे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेले होते.

तेव्हा सर्व संशयितांनी त्यांना दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली हाेती आणि शासकीय कामात अडथळा आणला हाेता. श्री. शेळके यांनी त्याची तक्रार पोलिस ठाण्यात केली हाेती. आटपाडी पोलिसांनी तपास करून संबंधितांबाबत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. साक्ष आणि पुराव्याच्या आधारे या चार ही संशयितांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: मार्केटमधून घराकडे निघालेल्या महिलेसोबत भयंकर घडलं, भररस्त्यात पोलिसाने छेड काढली नंतर...

Maharashtra News Live Update: सिद्धटेक येथे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Paan Gulkand Modak Recipe : तोंडात टाकताच विरघळणारा पान-गुलकंद मोदक, गणपतीच्या नैवेद्यासाठी परफेक्ट रेसिपी

High Court : 'Rent’ शब्द वापरल्याने भाडेकरूचा दर्जा मिळत नाही; ३२ वर्षे सुरु असलेल्या खटल्यावर हायकोर्टाचा मोठा निर्णय

Mumbai To Ashtavinayak : मुंबई टू अष्टविनायक; कार, बस की ट्रेन? जाणून घ्या कसा कराल सोपा अन् जलद प्रवास

SCROLL FOR NEXT