Eknath Shinde  Saam TV
महाराष्ट्र

Eknath Shinde : सावधान! कोरोना परत येतोय; राज्यात पुन्हा निर्बंध? CM शिंदेंनी बोलावली बैठक

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोरोनासंदर्भात बैठक बोलावली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Eknath Shinde Corona News : गेल्या काही दिवसांपासून जगभरात कोरोना व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. चीनमध्ये तर कोरोनाने कहर केला आहे. चीनमध्ये आढळून आलेल्या नव्या व्हेरिएंटची भारतातही रुग्ण आढळली आहे. यापार्श्वभूमीवर भारत सरकार अलर्ट झालंय, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील कोरोना आढावा बैठक बोलावली असताना आता दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कोरोनासंदर्भात बैठक बोलावली आहे. (Latest Marathi News)

प्राप्त माहितीनुसार, आज दुपारी ३.१५ वाजता विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री सावंत यांच्या उपस्थितीत कोविड नियंत्रण आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असून राज्यात पुन्हा मास्कसक्तीबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यात सध्या कोरोना परिस्थिती (Corona Virus) नियंत्रणात आहे. सुदैवाने आतापर्यंत नव्या व्हेरिएंटचा एकही रुग्ण राज्यात आढळून आलेला नाही. कोरोना प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्हणून विमानतळावर तपासणी आणि तपासणीत काही आढळून आल्यास तात्काळ विलगीकरण करण्याच्या सुचना दिल्या असल्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे.

पंतप्रधान मोदी आज काय निर्णय घेणार?

चीनमधील वाढती रुग्णसंख्या पाहता जगभरात पुन्हा एकदा कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. भारतातही दोन नवे रुग्ण आढळल्याने आरोग्य प्रशासन अलर्ट झालं आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने कोरोना संदर्भात बैठक बोलावली आहे.

कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. दुपारी ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीत मास्कसक्तीबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Why Mosquito Bites Itch: डास चावल्यावर प्रचंड खाज का येते?

Maharashtra News Live Update: शिरपूरमधील किराणा दुकान चोरीप्रकरणी दोघांना अटक

Apple Benefits: दररोज सकाळी फक्त १ सफरचंद खाण्याचे ७ फायदे; तिसरा फायदा वाचून थक्क व्हाल

Pune Tourism : पुण्याजवळ आहे महाराष्ट्रातील स्वित्झरलँड, एकदा नक्की भेट द्याच

पुण्यातील ३ वेळा आमदार राहिलेल्या दिग्गज नेत्याचे निधन; राज्याच्या राजकारणात शोककळा

SCROLL FOR NEXT