marriage SaamTvNews
महाराष्ट्र

Corona : नागपूरात कोरोनाच्या भीतीनं वाढतोय कोर्ट मॅरेजचा ट्रेंड!

ना कोरोनाची भीती ना इतर सोपस्कार; शॉर्टकट मॅरेजकडे वळताहेत तरुण...

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : नागपूरात कोरोनाच्या भीतीनं कोर्ट मॅरेज चा ट्रेंड वाढतोय. कोरोनाची भीती, कारवाईचा बडगा, खर्च या सर्वांवर पर्याय म्हणून नागपुरातील (Nagpur) विवाह इच्छुक तरुण-तरुणी कोर्ट मॅरेज (Court Marriage) हा पर्याय निवडत आहेत. त्यामुळंच नागपूरच्या विवाह नोंदणी कार्यालयात विवाह इच्छुक तरुण-तरुणींची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.

हे देखील पहा :

गेल्या 20 दिवसांत अडीचशे हुन अधिक जोडप्यांनी कोर्ट मॅरेज करत शॉर्टकट लग्न (Marriage) उरकलंय. नागपूरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आहे. कोरोना (Corona) बाधितांचा आकडा साडेचार हजारांवर गेलाय. राज्य सरकारनं अनेक निर्बंध कडक केलेत. लग्नात 50 जणांनाच परवानगी आहे. त्यावर लोकं वाढले तर महापालिका कारवाई करून दंड वसूल करते.

लग्नाला आलेल्या कुणी कोरोना बाधित (Corona Positive) असेल तर इतरांनाही बाधा होण्याची भीती असते. त्यामुळं कोर्ट मॅरेज केले तर कोरोनापासून बचाव करता येतो आणि खर्चातही बचत होते, त्यामुळं अनेक तरुण तरुणी या कोर्ट मॅरेज चा पर्याय निवडत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT