Nagapur News Saam Tv
महाराष्ट्र

Nagapur News: होळी साजरी करताना वाद! नागपूरच्या उमरेडमध्ये दोन गटात तुफान हाणामारी, VIDEO आला समोर

Nagapur Viral Video: नागपुरात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. उमरेड तालुक्यात राजुरवाडी पारधी येथे ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> पराग ढोबळे

Nagapur News:

नागपुरात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. उमरेड तालुक्यात राजुरवाडी पारधी येथे ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या हाणामारीत पाच जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी पारधी तांड्यावर होळी साजरी केली जात होती. यावेळी येथे मोठ्या संख्येने लोक जमले होते आणि धुळवड साजरी करत होते. याचदरम्यान येथे दोन गटामध्ये शाब्दिक वाद झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा वाद नेमका कशामुळे झाला, हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र हा वाद इतका वाढला की, दोन्ही गटात हाणामारी सुरु झाली. दोन्ही गटातील काही जणांनी एकमेकांवर लाठीकाठी आणि दगडांनी हल्ला चढवला. घटनेची माहिती मिळताच पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलं आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, हा घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत काही तरुण एकमेंकाना लाठीकाठी आणि दगडांनी मारहाण करताना दिसत आहेत. यात एक महिलाही दिसत आहे. ही महिला तिच्यासोबत असलेल्या तरुणाला वाचवताना दिसत आहे.

याचदरम्यान, ही महिला तिच्यासोबतच्या तरुणाचा बचाव करत असताना दुसऱ्या गटातील लोकांनी तिलाही लाठीने मारहाण केल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तसेच या घटनेतील काही तरुणांना ताब्यात घेऊन पोलीस चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचं आंदोलन

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

SCROLL FOR NEXT