अकोला - देशामध्ये मुलांपेक्षा मुली समोर जात आहे. आपण त्यांना समोर जाण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यातून त्या खूप पुढे गेल्या आहेत. तरीही आजही आपण 'बेटी बचाव बेटी पढाव' असा नारा देत आहे. हे काम चांगले असले तरी येणाऱ्या 20 ते 30 वर्षानंतर देशात सर्वात जास्त मुलींची संख्या ही IAS असणार आहे. त्यामुळे मुलं आणि मुली (Boys and girls) यांच्यातील हे अंतर कमी झालं पाहिजे. त्यांच्या मध्ये बॅलन्स Balance राहिले पाहिजे. यासाठी काम होणे आवश्यक आहे. अन्यथा युवा हा बेकार होईल, अशी भीती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor BhagatSingh Koshyari) यांनी आज व्यक्त केली आहे. (Controversial statement of the governor)
पहा व्हिडीओ -
राज्यपाल डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University) 35 व्या दीक्षांत समारंभामध्ये आभासी पद्धतीने अध्यक्षस्थानावरून बोलत होते. पुढे ते म्हणाले, देशात कृषी क्रांती नंतर श्वेतक्रांती झाली. आज पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) हे मांस मच्छी खात नाहीत. तरी पण ते म्हणतात हरितक्रांती श्वेतक्रांती झाली आता पाण्यावरील मच्छी उत्पादनाची क्रांती करण्यासाठी पुरेसे प्रयत्न होणे गरजेचे आहेत. देशात पोषक अन्नासाठी आपण काय करू शकतो, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण आत्मनिर्भर तरी बनू शकू का, यासाठी आपण काम करायला हवे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले आहे.
तसेच एक काळ होता माझ्यासोबत अकरावीपर्यंत एकही मुलगी शिकायला नव्हती. त्यानंतर मुली शिकायला आल्या आणि पदवी शिकतांना मुलींसोबत मी शिक्षण घेतले. त्यानंतर मुलींना शिक्षणात आणि सर्वच क्षेत्रात पुढे आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. त्यावर अजूनही काम सुरू आहे. आता मुलांपेक्षा मुली खूपच समोर आहे. त्यामुळे मुलांच्या आणि मुलींच्या प्रगतीमध्ये असलेले अंतर कमी करणे गरजेचे आहे. यासाठी कुलगुरू (Vice-Chancellor) आणि प्राध्यापकांनी (Professor) हे अंतर कमी कसे करता येईल, यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असेही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी शेवटी म्हणाले.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.