Washim News saam tv
महाराष्ट्र

Contractual Health Workers On Strike : वाशिम जिल्ह्याची आराेग्य यंत्रणा काेलमडली, ६२१ कर्मचा-यांचे कामबंद आंदाेलन

या आंदाेलनामुळे आरोग्य विभागाचे कामकाज प्रभावित झाल्याचे दिसून आले.

Siddharth Latkar

- मनोज जयस्वाल

Washim News : विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी वाशिम जिल्ह्यातील कंत्राटी पद्धतीने कामावर असलेले आराेग्य कर्मचा-यांनी बेमुदत कामबंद आंदाेलन पुकारले आहे. यामुळे आरोग्य विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. (Maharashtra News)

वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या दाेन दिवसांपासून कामबंद आंदोलन (aandolan) करुन ठिय्या मांडलेल्या आंदाेलकांनी साम टीव्हीशी बाेलताना शासन सेवेत समायोजन करणे, मानधनात वाढ करणे यासह अन्य मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष हाेत असल्याचे म्हटले. शासनाचे वेधण्यासाठी कंत्राटी अधिकारी-कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीने हे आंदाेलन छेडण्यात आल्याचे नमूद केले.

या आंदाेलनात वाशिम राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी नर्सेस, शहरी ग्रामीण एएनएम, जीएनएम, सीएनएम,प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माणाधिकारी असे एकूण वाशिम जिल्ह्यातील ६२१ सर्वच कंत्राटी, आरोग्य अधिकारी तसेच कर्मचारी सहभागी झाले आहेत. या आंदाेलनामुळे आरोग्य विभागाचे कामकाज प्रभावित झाल्याचे दिसून आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआनं सरकारला पाठवलं 15 प्रश्नांचं पत्र; उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी काढल्या शुद्धलेखनाच्या चुका

चड्डी बनियान गँग, त्यांनी त्यांची अब्रू वेशीला टांगलीय; एकनाथ शिंदे का भडकले? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील दाजीपूर फोंडा घाट परिसरात तुफान पाऊस

लाडकी बहीण योजना, अजितदादांची आठवण, महाराष्ट्राचा विकास; अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

मुख्यमंत्री बदलणार? आमदार एकवटले म्हणाले आम्हाला बदल पाहिजे; 26 फेब्रुवारीला हायकमांड दिल्लीत निर्णय देणार

SCROLL FOR NEXT