congress suspends narendra jichkar for six years
congress suspends narendra jichkar for six years saam tv
महाराष्ट्र

Congress News : ठाकरेंशी वाद भाेवला, काॅंग्रेस नेते नरेंद्र जिचकार पक्षातून निलंबित

Siddharth Latkar

- पराग ढाेबळे

Nagpur News :

पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत नागपूर प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव नरेंद जिचकार (narendra jichkar) यांचे सहा वर्षांसाठी काॅंग्रेसचे प्रथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण (congress leader prithviraj chavan) यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या शिस्त पालन समितीने जिचकार यांच्यावर कारवाई केली आहे. (Maharashtra News)

गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात नागपूर येथील महाकाळकर सभागृहात काँग्रेसने आयाेजिलेल्या विभागीय बैठकीत नरेंद्र जिचकार आणि शहराध्यक्ष तथा आमदार विकास ठाकरे (mla vikas thackeray) यांच्यात जोरदार राडा झाला होता. या बैठकीत माईक हिसकावल्याच्या कारणावरून हा वाद झाला होता.

या बैठकीस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole), विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar), सुनील केदार (sunil kedar) यासह अनेक नेते उपस्थित हाेते. ज्येष्ठ नेत्यांच्या समाेर आमदार ठाकरे आणि जिचकार यांच्यात वाद झाला होता.

या राड्यानंतर शिस्त पालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांना तक्रार करून काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव नरेंद्र जिचकार यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. जिचकार यांना कारणे दाखवा नोटीसही पक्षाकडून बजावण्यात आली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या संदर्भात त्यांनी 23 ऑक्टोबरला 2023 ला दिलेले उत्तर हे समाधानकारक नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या पक्षविरोधी वर्तनाबद्दल काँग्रेस प्राथमिक सदस्य पदावरून सहा वर्षांसाठी काढून टाकण्यात आले आहे असे पक्षातून सांगण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : ईस्टर्न एक्सप्रेस हायवेर मोठी वाहतूक कोंडी

Astro Tip: बेडजवळ चुकूनही ठेवू नका या गोष्टी;अन्यथा

Hair Care tips: रात्री केस विंचरुन झोपणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Salman Khan House Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणी हरियाणामधून सहाव्या आरोपीला अटक

Ghatkopar Hoarding Collapse: होर्डिंग कोसळल्या प्रकरणी मोठी कारवाई; मालकाविरोधात गुन्हा दाखल, बीएमसीने ठोठावला कोट्यवधींचा दंड

SCROLL FOR NEXT