chandrakant patil and nana patole  Saam Tv
महाराष्ट्र

'अहिंसेच्या मार्गाला जास्त महत्व देतो,पण...'; चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीनंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीच आम्ही समर्थन करत नाही. आम्ही अहिंसेच्या मार्गाला जास्त महत्व देतो, चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीनंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

संजय डाफ

Nana Patole News : भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. 'चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीच आम्ही समर्थन करत नाही. आम्ही अहिंसेच्या मार्गाला जास्त महत्व देतो. पण सातत्याने असं वक्तव्य करत भाजपनं एक षडयंत्र उभं केलं आहे. याच स्पष्टीकरण दिलं तरी लोक ते आता मान्य करणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. (Latest marathi News)

नाना पटोले यांनी प्रसार माध्यामांशी संवाद साधला. त्यावेळी नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटील यांच्या शाईफेकीवर प्रतिक्रिया दिली. पटोले पुढे म्हणाले, 'चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याततून पेशवाई मानसिकता दिसून आली आहे. वैचारीक आणि पुरोगामी महाराष्ट्राची ओळख भाजपने संपवली आहे. ते पहिले बोलतात आणि नंतरच विपर्यास केला असे म्हणणे चालणार नाही, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

दरम्यान, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या शाईफेकीनंतर राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून पटोले यांनी उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली. नाना पटोले म्हणाले, ' राज्यातील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची आहे. पण सरकारचेच मंत्री आमदार हे कायदा सुव्यवस्था बिघडवत आहे, असाही टोला हा पटोले यांनी लगावला.

'राज्याचे गृहमंत्री जर त्याला पाठिंबा देत असेल तर हे निंदनीय आहे, अशीही टीका नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

शिंदे सरकारमधील मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाष्य करताना पटोले पुढे म्हणाले, 'आरोप करण्याचा कॉन्ट्रॅक्ट भाजपला दिला आहे. भाजपचे वाचाळवीर हे स्वातंत्र्यवीर असल्यासारखे वागत आहेत. त्यांच्यावर वक्तव्य करणे हा काँग्रेसचा विचार नाही'.

'जनतेचा आणि काँग्रेस प्रशिक्षणाचा संयम आता तुटत चालला आहे. निषेध करणं ठीक आहे, पण शाई फेकच समर्थन करत नाही, पण मंत्र्यावर कायदा सुव्यवस्था राहिली की नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे, असेही पटोले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नागपुरात भीषण अपघात, मित्राचा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला जाताना दोन तरुणांचा मृत्यू

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेत ड्रामा, राऊतांसोबत बोलता बोलता देसाई म्हस्केंकडे गेले; पुढे काय घडलं? VIDEO चर्चेत

मुलं ही पालकांची मालमत्ता नाहीत! हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; पालकांनो हे नक्की वाचा

Mumbai : दादरच्या पॉश एरियात भयंकर प्रकार! प्रसिद्ध मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री, ६ तरुणी नको त्या अवस्थेत आढळल्या

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

SCROLL FOR NEXT