Political storm intensifies as opposition targets another NCP leader over alleged Kharat links. saam tv
महाराष्ट्र

Ashok Kharat: खरात प्रकरणामुळे अजित पवार गटातील आणखी एक महिला नेत्या विरोधकांच्या रडारवर; राजीनाम्याची केली मागणी

Harashvardhan Sapkal : अशोक खरात प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका महिला नेत्यावर विरोधी पक्ष टीका करत आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

Bharat Jadhav

  • खरात प्रकरणामुळे राजकीय वाद तीव्र

  • राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्या रडारवर

  • विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी

नाशिकमधील अशोक खरातशी अनेक राजकीय नेत्यांचे लागेबंध माहिती समोर येत आहे. ठाकरे गट काय अन् भाजप काय? किंवा राष्ट्रवादी असो शिवसेना सर्व पक्षांमधील नेत्याचं खरातशी काही ना काही संबंध असल्याची गोष्ट उघडकीस येत आहे. अशोक खरातशी जवळचे संबंध ठेवल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. चाकणकरांनंतर आता राष्ट्रवादीच्या आणखी एक महिला नेत्या गोत्यात येण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे अशोक खरात प्रकरणामुळे शिवसेनेचे नेते दीपक केसरकर आणि नीलम गोऱ्हे हे देखील अडचणीत आले आहेत. खरातसोबत त्यांचे फोटो असल्यानं त्यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जातेय. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अजित पवार गट राष्ट्रवादीच्या नेत्यावर जहरी टीका केली आहे. सपकाळ यांनी थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने पुरोगामी महाराष्ट्राची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे. याप्रकरणामुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. अशोक खरातनं शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केले आहे. तर दुसरीकडे महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या चाकणकर त्याच्या पाया पडताना दिसत होत्या. महिला, मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असताना महायुतीमधील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मात्र या प्रकरणी गप्प आहेत.

मंत्री आदिती तटकरे काय काम करत आहेत? असा प्रश्न करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्सवर पोस्ट करत मंत्री आदिती तटकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. काही काम नसेल, तर राजीनामा देऊन घरी बसा, असं सुनावले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावरून मंत्री तटकरे यांना डिवचलं आहे. त्यावर सत्ताधाऱ्यांकडून कशापद्धतीने प्रत्युत्तर दिलं जातं. आदिती तटकरे काय रिअॅक्शन देतात, याकडे लक्ष लागलं आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी आदिती तटकरे यांचा महिला आणि बालविकास मंत्री यांचा फोटो शेअर करत टोला लगावलाय. 'या आहेत आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना! आदिती तटकरे! राज्य सरकारमधील महिलांचा आवाज किंवा महिलांची जबाबदारी असलेल्या खात्याच्या त्या मंत्री आहेत, याकडे वेधलं.

'मागील काही दिवसांमध्ये खरात प्रकरण असो, यात यांच्या खात्या अंतर्गत येणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षांवर झालेले आरोप असो, पुण्यातील हृषीकेश वैद्य, काल समोर आलेलं नवी मुंबईतील आदर्श म्हात्रे प्रकरण, रोज राज्यातील महिला भगिणींसोबत अत्याचार झाल्याच्या प्रकरणं समोर येत आहेत. पण आपल्या महिला व बालविकास मंत्री बेपत्ता आहेत,' असा घणाघात सपकाळ यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संग्रामपूर तालुक्यात वादळी पावसाचा फटका; पळशी झाशी शिवारातील मका पिकाचे मोठे नुकसान

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पत्रिका पावसात भिजल्या; विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात|VIDEO

Rice cooking methods: पातेलं की कुकर? कशात शिजवलेला भात तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर?

सातारा ZP अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीच्या दिवशी सीसीटीव्ही बंद असल्याचे पत्र समोर|VIDEO

मध्य रेल्वेच्या १० स्थानकांवर लवकरच मिळणार आपत्कालीन मेडिकल सुविधा

SCROLL FOR NEXT