Devendra Fadnavis - Rajesh Rathod Saam Tv
महाराष्ट्र

Congress MLA Rajesh Rathod Security : काँग्रेस आमदाराला सुरक्षा पुरवणार, नाराजीनंतर देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन

Congress MLA Rajesh Rathod Security : मला धमक्या येत होत्या. मागचा आठवड्यात माझी कार देखील फोडली. मागच्या अधिवेशनात मला सुरक्षा पुरवण्याबाबत मागणी करण्यात आली होती, असं राजेश राठोड यांनी म्हटलं.

सूरज सावंत

Nagpur Winter Session News :

काँग्रेस आमदार राजेश राठोड यांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, गुरुवारी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात दिली. सुरक्षेच्या मागणीवर कार्यवाही न झाल्याने राठोड यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर फडणवीस यांनी हे आश्वासन दिले.

मला धमक्या येत होत्या. मागचा आठवड्यात माझी कार देखील फोडली. मागच्या अधिवेशनात मला सुरक्षा पुरवण्याबाबत मागणी करण्यात आली होती. मला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यासाठी आश्वासन देण्यात आले; परंतु अद्याप सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली नाही. गांभीर्याने हा विषय घेण्यात आला नाही, असे आम्हाला खेदाने सांगावं लागतं, अशी तीव्र नाराजी राठोड यांनी व्यक्त केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेतली. राठोड यांना तात्काळ सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात येईल आणि आतापर्यंत सुरक्षा का देण्यात आली नाही याची माहिती घेतली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. (Winter Session 2023)

अधिवेशन काळात सुमारे 11 हजार पोलिसांचा बंदोबस्त

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी सुमारे 11 हजार पोलीस अधिकारी कर्मचारी हे नागपुरात बंदोबस्तासाठी आहेत. यामध्ये पोलीस कर्मचारी एसआरपी, होमगार्ड यासह पोलीस अधिकारी कर्मचाऱ्याचा समावेश आहे. चार ते पाच हजार पोलीस कर्मचारी हे शहर पोलीस दलातील असून सुमारे 6 हजार कर्मचारी हे राज्यभरातून विविध ठिकाणाहून आलेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT