Congress Aandolan, Parbhani, Kolhapur,  saam tv
महाराष्ट्र

Congress Andolan : 'मोदी-अडानी भाई- भाई, देश बेचके खाए मलाई...' काॅंग्रेसने छेडले जेलभराे आंदाेलन

महागाई, आदी विषयांवर राज्यभरात ठिक ठिकाणी काॅंग्रेस आंदाेलन छेडणार आहे.

Siddharth Latkar

- राजेश काटकर / रणजीत माजगावकर

Congress Aandolan : मोदी अडानी भाई भाई... देश बेच कर खाई मलाई... मोदी हटवा लोकशाही वाचवा अशा घाेषणा देत आज काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी माेदी-शहा यांच्या कारभाराचा निषेध नाेंदविला. राज्यातील काेल्हापूर, परभणी येथे काॅंग्रेस, युवक काॅंग्रेस यांच्यावतीने आंदाेलन छेडण्यात आले. (Maharashtra News)

काेल्हापूरात आंदाेलन

काँग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी (rahul gandhi) यांना गुजरातच्या कनिष्ठ न्यायालयाने २ वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्या विरोधात जिल्हा सत्र व उच्च न्यायालयात अपील केले हाेते. दोन्ही न्यायालयानी शिक्षेस स्थगिती दिली नाही. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने कोल्हापुरात तीव्र निदर्शने करण्यात आली.

कोल्हापूर (kolhapur) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जिल्हा अध्यक्ष आमदार सतेज पाटील (mla satej patil) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदाेलन छेडण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील (mla p n patil), आमदार ऋतुराज पाटील (mla ruturaj patil) यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले हाेेते.

परभणीत युवक काॅंग्रेसचे आंदाेलन

परभणी (parbhani) येथे आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक (chhatrapati shivaji maharaj chowk) येथे युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या उपस्थितीत युवक काँग्रेसच्या वतीने वाढती महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदाेलनकर्त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले. या आंदोलनात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात पुणे पोलिसांचा अनोखा उपक्रम, तब्बल १२ जणांचे पुनर्वसन

Pradeep Purnekar Case : पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, नवीन व्हिडीओ आला समोर, मुलाचा खळबळजनक दावा

Maharashtra News Live Update: दिल्लीच्या हवेची गुणवत्ता खालावली

Rice Hacks : भात शिजवताना १ तमालपत्र नक्की घाला; मिळतील 'हे' ६ फायदे

जरांगे-पाटील संधी साधूपणा करताय; भरत गोगावलेंचा टोला,शिंदेंवरील 500 कोटींच्या आरोपांवरून राजकारण तापलं!

SCROLL FOR NEXT