Rahul Gandhi Saam Tv
महाराष्ट्र

VIDEO: Rahul Gandhi विठूरायाच्या दर्शनाला येणार?, आषाढी वारीत सहभागी होण्याची शक्यता

Rahul Gandhi Will Visit Pandharpur: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात येणार आहेत. पंढरपूरमध्ये येऊन राहुल गांधी विठुरायाचे दर्शन घेण्याची शक्यता व्यक्त केले जात आहे.

Priya More

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यानंतर आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे देखील आषाढी वारीमध्ये सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राहुल गांधी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला येऊन विठूरायाचे दर्शन घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाकडून विठ्ठल मंदिर प्रशासनाकडे विचारणा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

राहुल गांधी १३ किंवा १४ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या आधी विठुरायाचे दर्शन घेण्याची शक्यता आहे. राहुल गांधी आषाढी वारीमध्ये सहभागी होणार असल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी जर आषाढी वारीमध्ये सहभागी झाले तर या निवडणुकीमध्ये काँग्रेसला चांगला फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच निमित्ताने आता आषाढी वारीची देशपातळीवर चर्चा होताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jui Gadkari: थायलंडमध्ये मध्यरात्री हरवली प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री; सोलो ट्रिपमधील धक्कादायक अनुभव सांगत म्हणाली...

Buldhana : दुर्दैवी! पोहण्याचा मोह जीवावर बेतला, पाय घसरून खोल नदीत २ मुलं बुडाली

लांब केसांसाठी दालचिनीचा घरगुती सोपा उपाय करा

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार?, भाजपकडून पहिली प्रतिक्रिया; चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

Maharashtra News Live Update: जादूटोणा प्रकरणाच्या तपासाला वेग; फिरोज शेख यांच्यावरील आरोप मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी फेटाळले

SCROLL FOR NEXT