Prithviraj Chavan, Narendra Modi, Rahul Gandhi
Prithviraj Chavan, Narendra Modi, Rahul Gandhi Saam Tv
महाराष्ट्र

Congress Party News : राहूल गांधींच्या लाेकप्रियतेला माेदी घाबरले : पृथ्वीराज चव्हाण

Siddharth Latkar

Rahul Gandhi News : सूरत न्यायालयाने काॅंग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) दोन वर्षांची शिक्षा सुनावली. या निकालानंतर आज (शुक्रवार) राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने या संदर्भात आज एक अधिसूचना जारी केली. दरम्यान या निर्णयाचा निषेध देशभरातील काॅंग्रेस नेत्यांसह कार्यकर्ते करु लागले आहेत. (Breaking Marathi News)

काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी ट्विट करुन या कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे. हे सुडाचं राजकारण आहे. माेदी राहूल गांधींना किती घाबरलेत हे यावरुन दिसत आहे असेही आमदार चव्हाण यांनी म्हटलं आहे.

माेदी हे राहूल गांधींच्या लाेकप्रियतेला घाबरले आहेत. ही अघाेषित आणीबाणी आणण्याचा प्रयत्न आहे अशी टीका आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या सरकारवर केली आहे.

भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींना, काँग्रेसला देशात प्रतिसाद वाढत असल्याचे दिसून आले. तसेच महागाई, बरोजगारीमुळे मोंदीवरोधात वातावरण निर्मिती होत आहे. संसदेतील गांधींचा आवाज बंद करण्यासाठी ही शिक्षा झाली आहे असेही चव्हाण यांनी नमूद केले.

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा भाजपचा प्रयत्न अनेक वर्षांपासूनचा आहे. त्याच अनुषंगाने कर्नाटकमधील जुने भाषण उकरून (Rahul Gandhi Controversial Speech) काढून ही कारवाई केली गेली असे नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पुण्यात राहुल गांधींची सभा, ३ मे ला Sspms ग्राउंडवर होणार सभा

Shantigiri Maharaj: नाशिकमध्ये शिंदे गटाकडून शांतीगिरी महाराजांना उमेदवारी?

KKR vs DC: कोलकताच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीची बत्ती गुल; KKRसमोर १५४ धावांचे आव्हान

Maharashtra Politics: राज ठाकरेंची तोफ कोकणात धडाडणार, नारायण राणेंसाठी घेणार सभा

Amit Shah यांच्या हेलिकॉप्टरचं नियंत्रण सुटलं, मोठा अनर्थ टळला!

SCROLL FOR NEXT