Sapkal Slams Ajit Pawar and Chandrakant Patil Saam
महाराष्ट्र

पुण्यातील गुन्हेगारीला बळ देणारा 'दादा' कोण? काँग्रेसच्या नेत्याकडून अजित पवारांवर हल्लाबोल

Sapkal Slams Ajit Pawar and Chandrakant Patil: काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळांचा अजित पवार अन् चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून टिका.

Bhagyashree Kamble

  • काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल.

  • अजित पवार अन् चंद्रकांत पाटील यांच्यावर प्रहार.

  • पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचा उपस्थित केला मुद्दा.

अक्षय गवळी, साम टिव्ही

वाढत्या गुन्हेगारीवरून पुण्यातील वातावरण बिघडत चाललं असल्याचं चित्र आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला बळ देणारा 'दादा' कोण?, असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरही भाष्य केलं आहे.

काँग्रेसच्या अमरावती विभागाच्या आढावा बैठकीसाठी हर्षवर्धन सपकाळ अकोल्यात आले होते. प्रसारमाध्यामांशी चर्चा कराताना त्यांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच सत्ताधारी नेत्यांवर प्रहार केला. यासह 'गुंड निलेश घायवळ'ला चंद्रकांत पाटलांची मदत असल्याच्या शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकरांच्या आरोपांवर ते बोलत होते.

पुण्यातील गुन्हेगारांच्या पाठीशी भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी असल्याच्या आमच्या आरोपाला धंगेकरांच्या आरोपामुळे पुष्टी मिळाल्याचं सपकाळ म्हणाले. यावेळी सपकाळ यांनी आनंदाचा शिधा या योजनेवरूनही टीका केली. 'एकनाथ शिंदेंचं मोठेपण होऊ नये, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आनंदाचा शिधा योजना बंद करण्याचा निर्णय घेतला', असंही सपकाळ म्हणाले. यानंतरचा टप्पा हा लाडकी बहीण योजना बंद करण्याचा राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सपकाळांचा चंद्रकांत पाटील यांच्यावर प्रहार

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर सपकाळ म्हणाले, 'पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये ड्रग्ज विकणाऱ्याला कोणी मदत केली?, हे महाराष्ट्रासमोर उघड आहे. पुण्यामधील वाढती गुन्हेगारी आणि कोयता गॅंगच्या पाठीमागे कोणता 'दादा' आहे? हे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावं', असं सपकाळ म्हणाले.

हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. 'पुण्यातील गुन्हेगारीला भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांची राष्ट्रवादी जबाबदार आहे, या आमच्या आरोपावर धंगेकरांच्या आरोपांमुळे शिक्कामोर्तब होतोय.'असंही सपकाळ म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT