Congress Leaders Son Missing SAAM TV
महाराष्ट्र

सामान घ्यायला घराबाहेर पडला, तो परतलाच नाही; लग्नाच्या एक दिवस आधी काँग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता

Congress Leaders Son Missing : अमरावतीतील काँग्रेस पक्षाचे नेते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा वैभव बेपत्ता झाला आहे. वैभवचे उद्या लग्न आहे. सकाळी सामान घेण्यासाठी तो घराबाहेर पडला होता.

Yash Shirke

अमर घटारे, साम टीव्ही, प्रतिनिधी

अमरावतीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावतीतील काँग्रेस पक्षातील बड्या नेत्याचा मुलगा बेपत्ता झाला आहे. या तरुणाचे उद्या लग्न असल्याचे म्हटले जात आहे. अमरावतीच्या फ्रेजरपुडा पोलीस ठाण्यात तरुणाच्या वडिलांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. बेपत्ता तरुणाला शोधण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वैभव मोहोड (वयवर्ष ३०) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे. वैभव हा काँग्रेस पक्षाचे नेते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा आहे. वैभव शिवाजी महाविद्यालयामध्ये लिपिक म्हणून कार्यरत आहे. त्याच उद्या लग्न होतं पण त्याआधीच तो बेपत्ता झाला.

आज (१३ मे) सकाळी सामान आणायला बाहेर जातो असे सांगत वैभव घराबाहेर पडला होता. पण बराच वेळ झाला तरीही तो घरी परतला नाही. त्यामुळे हरिभाऊ मोहोड यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. वैभवने सकाळी एटीएममधून ४० हजार रुपये काढल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास फ्रेजरपुरा पोलीस करत असून वैभव बेपत्ता झाल्याची नोंद घेतली आहे.

उद्या लग्न असलेल्या काँग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता झाल्याने अमरावतीत खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे नेते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड यांचा मुलगा वैभव मोहोड बेपत्ता झाला आहे. सामान आणायला जातो असे सांगून वैभव सकाळी घराबाहेर पडला होता. त्याने बँकेच्या खात्यातून ४० रुपये काढल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air fare Hike: युद्धाचा फटका विमान प्रवासाला, तिकीटाच्या दरात मोठी वाढ; किती खर्च करावा लागणार?

कोरोना लसीमुळे साईड इफेक्ट्स झाला? सरकारला द्यावा लागणार मोबदला; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Maharashtra Live News Update : कोल्हापूरमध्ये कमर्शियल गॅस पुरवठा तात्पुरता बंद

New Rule : कार, दुचाकी ट्रान्सफरसाठी आता NOC ची गरज नाही, सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय, वाचा

Trending Blouse Designs: ब्लाऊजच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स, कोणत्याही साडीत उठून दिसेल मागचा गळा

SCROLL FOR NEXT