Nana Patole and eknath Shinde group saam tv
महाराष्ट्र

झाडी, डोंगर आणि हॉटेल...हेच सुरू आहे, बंडखोर आमदारांमुळं हॉटेलचं बील वाढेल, नाना पटोले म्हणाले...

सुप्रीम कोर्टाकडून सर्व पक्षकारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) आणि महाविकास आघाडी सरकारने (mva government) दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात (supreme court) नुकतीच सुनावणी झाली. कोर्टाकडून सर्व पक्षकारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. शिंदे गटाच्या याचिकेवरील पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना वेग आलं आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या राजकीय वातावरण तापलं असतानाच काय ती झाडी, काय तो डोंगर आणि काय तो हाटील, असं विधान एका बंडखोर आमदाराने केलं होतं. त्यानंतर राजकीय क्षेत्रातून मिश्किलपणे टिप्पणीही करण्यात आली. गुवाहाटीत झाडी, डोंगर आणि हॉटेल हेच सुरु आहे. बंडोखार आमदारांमुळं हॉटेलचं बील वाढेल, असा टोलाही पटोले यांनी लगावला आहे.

माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, कोर्टाने अजून निर्णय दिला नाही. सगळी स्थिती तपासून प्रतिक्रिया देईल. बंडखोर आमदारांना वेळ दिला आहे, तर ठीक आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करून प्रतिक्रिया देता येईल.उपाध्यक्षांवर अविश्वासचा ठराव आणलाय. पण त्यात काही ठोस मुद्दा नाही. दिल्लीत बसून सगळी स्क्रिप्ट तयार केलीये. सर्वोच्च न्यायालयाबद्दल आपल्याला काही बोलत येत नाही.

विधिमंडळ हे स्वतंत्र संस्था आहे. विधिमंडळ आणि न्यायालय यांच्यात कॅल्श होऊ नये,यासाठी प्रयत्न व्हावेत. राज्याच्या परिस्थितीवर बोलताना पटोले पुढे म्हणाले, राज्यात अस्थिर वातावरण असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. रोजगाराचा प्रश्न आहे. तसंत पटोले यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले, कायदा सुव्यवस्था सांभाळणे हे राज्याचं काम आहे. राज्यात केंद्राची धुसखोरी का ? आसाममध्ये पुराची स्थिती असताना तेथील मुख्यमंत्री हे बंडखोर आमदारांचा सेवेत आहेत.

बंडाखोर आमदारांना धमकी देण्यावर पटोले म्हणाले, केंद्राचे मंत्री पण हीच भाषा बोलतात. कोणाला धमकी देण्याला आम्ही समर्थन देत नाही. आमचा पक्ष गांधी विचारांचा आहे. सुनावणी लांबणीवर पडली आहे त्यामुळे हॉटेलच बिल वाढेल. केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग सुरू आहे. गुवाहाटीत ईडी काम का करत नाही ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विधान परिषद निवडणुकीसाठी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार

अचानक धनलाभ होईल,खिशात पैसा खेळता राहील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या गोष्टी घडतील

Fact Check: जांभळाचा सडा म्हणजे यंदा दुष्काळ पडणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Anganwadi scheme : महिला-मुलांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, आदिती तटकरेंनी दिली माहिती

घरात CCTV लावून पाळत, शेजाऱ्यांशी बोलल्यास मारहाण; लग्नानंतर अवघ्या ४५ दिवसांतच पत्नीची आत्महत्या, 'त्या' डॉक्टर पतीला बेड्या

SCROLL FOR NEXT