Balasaheb Thorat News Saam tv
महाराष्ट्र

Balasaheb Thorat News: धीरेंद्र शास्त्रीच्या साईबाबांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर बाळासाहेब थोरत संतापले; म्हणाले...

बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री याने आता साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. धीरेंद्र शास्त्रीच्या विधानाचा शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांनी निषेध केला आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

सचिन बनसोडे

Balasaheb Thorat News : बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री याने आता साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. धीरेंद्र शास्त्रीच्या विधानाचा शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांनी निषेध केला आहे. यानंतर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील त्याच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. (Latest Marathi News)

महाविकास आघाडीचे नेते बाळासाहेब थोरात हे शिर्डीहून समृद्धी महामार्गाने वज्रमुठ सभेसाठी संभाजीनगरकडे रवाना झालेत. तत्पूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना थोरातांनी राज्यातील विविध मुद्द्यावर भाष्य केलं.

बाळासाहेब थोरात म्हणाले, 'सध्या नवनवीन महाराज तयार होत आहेत. सरकार त्यांना संरक्षण देतंय. हा देश बंधूभावाने चालवायचा की दंगलीने भरलेला करायचा असं वाटून जाणार हे सगळं वातावरण आहे'.

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, 'तथाकथित नवीन महाराज तयार होतात. त्यातीलच हे बागेश्वर महाराज आहेत. धीरेंद्र शास्त्रीने संत तुकारामांनंतर आता साईहबाबांबद्दल वक्तव्य केलं. साईबाबांबद्दलचे त्याचे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे'.

'आपल्या श्रद्धास्थानांवर आघात करण्याचा हा प्रयत्न असून संतांवर आघात करणे हाच सनातनी धर्म आहे का? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केलाय.. तर नवीन निर्माण झालेली आणि द्वेष पसरवणारी ही मंडळी असून सरकारचं या गोष्टींना प्रोत्साहन असल्यासारखे दिसते, अशी टीका थोरात यांनी केली.

'ही सगळी मंडळी द्वेष पसरवणारी आणि वर्णभेद निर्माण करणारी आहे.. यांचा बंदोबस्त सरकार करत नसेल तर लोकांनी यांचा बंदोबस्त केला पाहिजे, अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी धीरेंद्र शास्त्री आणि कालीचरण महाराज यांचा समाचार घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon 2026 Update: जूनमध्येही उष्णतेचा तडाखा कायम; महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस

Maharashtra News Live Update: अकोल्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

९० किमी वेग, धडकी भरवणारं वादळ धडकणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, कुठे कोसळणार धो-धो पाऊस?

T20 वर्ल्ड कप खेळणारा संघ निलंबित; IPL होताच ICCची मोठी कारवाई

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT