Balasaheb Thorat Saam TV
महाराष्ट्र

राज्यपालांच्या वक्तव्यापासून निसटण्यासाठी ईडीची कारवाई; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

आज सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीने धाड टाकली.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: आज सकाळी शिवसेना (ShivSena) नेते खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीने धाड टाकली. ईडीची चौकशी अजुनही सुरू आहे. यावर आता राज्यातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यपाल यांच्या वक्त्यावरून उठलेल्या गोंधळाकडून निसटण्यासाठी ईडीची कारवाई केली असल्याचा आरोप थोरात यांनी भाजपवर केला आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले, राज्यपाल यांच्या वक्त्यावरून उठलेल्या गोंधळाकडून निसटण्यासाठी ईडीची कारवाई केली आहे. संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईच्या घटनेकडे मी कसा पाहतोय यापेक्षा महाराष्ट्रासह देशातील जनता कशी पाहते हे महत्वाच आहे. तपास यंत्रणेचा उपयोग हा देशाच्या हिताकरता न करता राजकारणासाठी केला जात आहे, असंही थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले.

एखादी गोष्ट हट्टाला पेटल्यासारख दिसत आहे. राज्यपालांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. या वातावरणातून जे शिंतोडे भाजप आणि राज्यपालांवर उडतायत त्यातून निसटण्याचा हा प्रयत्न दिसत आहे. तपास यंत्रेणेचा राजकारणासाठी सत्तेचा दुरूपयोग होतोय असच जनता म्हणणार ही वस्तुस्थिती आहे, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचे (ED)पथक दाखल झाले आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे. ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच राऊत यांच्या घरी पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक आहे. संजय राऊत यांना गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीने समन्स पाठवले होते. (Sanjay Raut Latest News)

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भांडूपमधील मैत्री या निवासस्थानी ईडीचे पथक दाखल झाले आहे. या आधीही पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. त्यांना अनेकवेळा समन्स बजावण्यात आले होते. मात्र त्यांनी चौकशीसाठी सहकार्य न केल्याने ईडीचे पथक आता त्यांच्या घरी दाखल झाले असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT