congress  Saam tv
महाराष्ट्र

ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसणार, बडा नेता माजी नगरसेवकांसोबत शिंदे गटात प्रवेश करणार?

KDMC Election : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा बसण्याची शक्यता आहे. कल्याणमधील बडा नेता माजी नगरसेवकांसोबत शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

ऐन निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता

सचिन पोटे हे समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता

पोटे यांच्या निर्णयाने कल्याणमधील राजकारणाला मिळणार नवे वळण

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण : ऐन केडीएमसी निवडणुकीत कल्याण शहरात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चाहुल लागली आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच निवडणूक प्रचार प्रमुख सचिन पोटे हे आपल्या समर्थक आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश करण्याची प्रबळ शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील इतर पक्षांचे काही माजी नगरसेवक तसेच काही बडे राजकीय नेतेही त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्यासोबत ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे स्थानिक राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्याच महिन्यात सचिन पोटे यांच्यासह अनेक समर्थक पदाधिकाऱ्यांनी पक्षातील आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. त्यानंतर भाजप आणि शिवसेना या दोन्ही प्रबळ सत्ताधारी पक्षांकडून त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र यामध्ये सचिन पोटे यांनी शिवसेना आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पसंती दिल्याची माहिती समोर येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा पक्षप्रवेश शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होण्याची शक्यता आहे. या घडामोडीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. सचिन पोटे यांच्यासह इतर नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या पक्ष प्रवेशामुळे कल्याण डोंबिवलीतील शिवसेनेची ताकद आणखी वाढेल, असे मत राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT