congress news  Saam tv
महाराष्ट्र

ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; प्रज्ञा सातव यांच्यानंतर आणखी एक नेता साथ सोडणार

Maharashtra Politics : ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. प्रज्ञा सातव यांच्यानंतर आणखी एक नेता साथ सोडणार असल्याचे समोर आलं आहे.

Vishal Gangurde

केडीएमसी निवडणुकीआधी काँग्रेसला एकामागोमाग मोठे धक्के बसत आहेत.

विमल ठक्कर यांनीही काँग्रेसला राजीनामा दिलाय.

ठक्कर हे शेकडो कार्यकर्त्यांसह मोठे शिंदे सेनेत प्रवेश करण्याची शक्यता

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांनी ठाकरे गट आणि भाजपला धक्का

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

केडीएमसी निवडणुकीचे बिगुल वाजताच कल्याण डोंबिवलीत काँग्रेस पक्षाला एकामागोमाग एक मोठे धक्के बसत आहेत. माजी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच काँग्रेसचे माजी ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तर हिंगोलीत काँग्रेसच्या नेत्या प्रज्ञा सातव यांचा देखील भाजप प्रवेश ठरल्याची चर्चा आहे.

विमल ठक्कर यांनी दहा ते बारा प्रमुख पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. विकासाच्या दृष्टीने आणि लोकहितासाठी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे ठक्कर यांनी स्पष्ट केले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या गतिमान व विकासाभिमुख कामकाजामुळे प्रभावित होऊन हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितलं. काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर यांच्यासह संबंधित पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे आणि सदस्यत्वाचे राजीनामे सादर केले आहेत.

गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश होणार आहे. केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. कल्याण–डोंबिवलीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता यामुळे अधिकच बळावली आहे.

अजित पवारांचा पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरे गट आणि भाजपला धक्का

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतच अजित पवारांनी ठाकरे गट आणि भाजपला जोरदार धक्का दिला आहे. पिंपरी चिंचवड शहरात ठाकरे गट आणि भाजपचे नगरसेवक आणि चार महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ मनगटी बांधलं. भाजप नगरसेवकानेही राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीच लढाई सुरु झाल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरलं! वादाने टोक गाठलं, नवऱ्याने पत्नीला बेदम मारलं; जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

Cat Shubh Or Ashubh: अपशकून मानल्या जाणाऱ्या मांजरीची 'इथे' केली जाते पूजा

Cheapest Gold: सर्वात स्वस्त सोनं इथं मिळते?

Ajit Pawar Death: अजितदादांच्या अपघाताच्या तपासातून धक्कादायक माहिती उघड, विमानातील दोन्ही रेकॉर्डर जळून खाक

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी अपडेट, आणखी तिघांची होणार नार्को टेस्ट

SCROLL FOR NEXT