इंधन दरवाढीविरोधात सोलापुरात काँग्रेसचे 'सायकल रॅली'आंदोलन  विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

इंधन दरवाढीविरोधात सोलापुरात काँग्रेसचे 'सायकल रॅली'आंदोलन

केंद्र सरकार इंधन दरवाढीवर काेणत्याही प्रकारच्या उपाययाेजना करण्यात नसल्याच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेस पक्षाच्या वतीने सायकल आणि बैलगाडी रॅली काढण्यात आली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विश्वभूषण लिमये

साेलापूर : काेविड-19 मुळे आधीच अनेकांवर बेराेजगारीचे संकट आले आहे. वाढत्या महागाईमुळे नागरिक मेटाकुटीला आले असून त्यातच इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकार इंधन दरवाढीवर काेणत्याही प्रकारच्या उपाययाेजना करण्यात नसल्याच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेस पक्षाच्या वतीने सायकल आणि बैलगाडी रॅली काढण्यात आली. ही रॅली काँग्रेस भवन ते डफरीन चौक अशी काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने तरुणांनी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. Congress 'cycle rally' agitation in Solapur against fuel price hike

हे देखील पहा -

सध्या देशात पेट्रोल डिझेल दरवाढीने उच्चांक गाठला आहे. राज्यात पेट्रोलने शतक केव्हाच पार केले आहे. मात्र पेट्रोलच्या दरात दररोज भर पडतच चालली आहे. सध्या साेलापूर शहरात पेट्रोलचे दर १०६ रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत. वारंवार वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने आता नागरिकांना सायकल हाच पर्याय असल्याचं मत व्यक्त करत केंद्र सरकारच्या शोषक धोरणांचा निषेध करण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन केलं होतं.

ही सायकल रॅली काँग्रेस भवन ते डफरीन चौक अशी काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने
काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: तिसऱ्या फेरीनंतर नाशिमधल्या कोणत्या मतदारसंघात काय स्थिती?

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: सुरूवातीचे कल महायुतीकडे, १५४ जागांवर आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

SCROLL FOR NEXT