नांदेडमध्ये काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा; संयोजकांवर गुन्हा दाखल  संतोष जोशी
महाराष्ट्र

नांदेडमध्ये काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा; संयोजकांवर गुन्हा दाखल

नांदेडमध्ये काल काँग्रेसने वाढत्या इंधन दरवाढीविरोधात बैलगाडी मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, कोरोना नियमांना पायदळी तुडवल्याचा ठपका ठेवत संयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड - नांदेडमध्ये काल काँग्रेस पक्षाच्या वतीने वाढत्या इंधन दरवाढीविरोधात बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोना नियमांना पायदळी तुडवल्याचा ठपका ठेवत संयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मोर्च्यामध्ये अशोक चव्हाण यांचा देखील सहभाग होता. Congress bullock cart march in Nanded Filed a crime against organizers

हे देखील पहा -

नांदेड मध्ये काल काँग्रेस पक्षाच्या वतीने बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्याला काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला होता. काल या मोर्च्यास हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी संयोजकांसह पाच जणांविरोधात वजिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बैलगाडी मोर्चात पालकमंत्री अशोक चव्हाण, आमदार अमर राजूरकर, आमदार माधवराव पाटील जळगावकर, आमदार मोहन हंबर्डे यांच्यासह हजारों काँग्रेसचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. काल वंचित बहुजन आघाडीनेही कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

आज काँग्रेसचे जिल्हा सचिव उमाकांत पवार यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असताना दुसरीकडे मात्र काँग्रेसने काढलेल्या मोर्चात नियमांचे सर्रास उल्लंघन केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT