महायुती  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : भ्रष्टाचारासाठी बसलेले अवकाळी सरकार, काँग्रेसचा महायुतीवर घणाघात

Congress leader Harshvardhan Sapkal : महायुती सरकार हे भ्रष्टाचारासाठीच बसवलेलं अवकाळी सरकार आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. लाडकी बहिण योजना आणि निवडणूक खर्चावरून महायुतीवर जोरदार हल्ला चढवला.

Namdeo Kumbhar

मनोज जैस्वाल, वाशिम प्रतिनिधी

Maharashtra Politics, Congress Slams Mahayuti : निवडणुकीत पैसा फेक तमाशा देख, असा खेळ महायुती सरकारने सुरू केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते वाशिममध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली. लाडकी बहीण योजनासह महायुतीच्या राजकारणवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भ्रष्टाचारासाठी बसलेले हे अवकाळी सरकार असल्याची टीकाही यावेळी सपकाळ यांनी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना सरसकट लाभ देणं सरकारची चूक असल्याची कबुली दिल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पवारांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. निवडणुकीत पैसा फेक तमाशा देख असा खेळ महायुती सरकारनं केला, महिला सबलीकरणाची यांची कधीच भावना नव्हती. यांना जनतेच्या प्रश्नाचं देणंघेणं नाही. केवळ भ्रष्टाचारासाठी बसलेलं हे अवकाळी सरकार आहे, अशी जोरदार टीका सपकाळ यांनी केली. ते वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथ दर्शनासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना हे वक्तव्य केलं.

गांधी घराण्याबद्दल बोलण्याची लायकी नितेश राणेंची नाही.

ज्यांच्या वडिलांनी, आजींनी देशासाठी बलिदान दिलं, अशा राहुल गांधी यांच्याबद्दल बोलण्याची लायकी नितेश राणेंची नाही. अश्या शब्दात मंत्री नितेश राणेंचा चांगलाच समाचार सपकाळ यांनी घेतला. मूळ मुद्यापासून भरकटवण्यासाठी सरकणारे काही लोकांना सोडून दिलं आहे. बेताल, चेतावणीखोर वक्तव्य करणे, गटारगंगा ज्याच्या तोंडात आहे, अशा राणेंना सरकारने सोडून दिले आहे. यांच्याकडे शेतकऱ्यांसाठी, लाडकी बहिणींसाठी बोलण्यासाठी काहीच नाही, असा घणाघाती आरोप सपकाळ यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story : गरीबी आणि संघर्षातून यशाला गवसणी! पालावर राहणाऱ्या सनीने पटकावलं आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतासाठी सुवर्णपदक

Smita Gondkar Photos: 'पप्पी दे पारूला' फेम अभिनेत्रीचा हॉट अंदाज, फोटो पाहून नजर भिरभिरेल

भाजपात पक्ष प्रवेशाचा धडाका; शिवसेना ठाकरे गट अन् काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या हाती कमळ

बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना संपवण्याचा भाजप–RSSचा कट; ठाकरेंच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट|VIDEO

Gajar Halwa Recipe: कडाक्याच्या थंडीत बनवा गाजराचा गरमागरम हलवा, लगेच लिहून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT