Ashok Chavan On CM Eknath Shinde : 2014 ते 19 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेंव्हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेचं पाच नेत्यांच शिष्टमंडळ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन आपल्याकडे आलं होतं, असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केला आहे. अशोक चव्हाणांच्या या गौप्यस्फोटानंतर एकनाथ शिंदे यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. (Ashok Chavan News Today)
2019 मध्ये युतीमधून बाहेर पडत शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत येऊन सरकार स्थापन केले. या घटनेने राजकीय जाणकारांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, शिवसेनेला भाजपसोबत राहायचे नाही, ही भूमिका देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच झाली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करू अशा आशयाचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे वरिष्ठ नेते आपल्याकडे आले होते. ज्यात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता. असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. (Maharashtra News)
त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका बदलून भाज पण भाजपासोबत आता राहायचे नाही ही शिवसेनेची भूमिका त्यापूर्वी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारच्या काळातच झाली होती. आपण, म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करू अशा आशयाचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे वरिष्ठ नेते ज्यात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता. या सर्वांनी माझी माझ्या मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती असे चव्हाण यांनी सांगितले. (Latest Marathi News)
या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, अनिल देसाई, दिवाकर रावते, विनायक राऊत हे सुद्धा आले असल्याचं चव्हाणांनी म्हटलं आहे. दरम्यान, अशा प्रकारचे सरकार स्थापन करायचे असल्यास तुम्ही आधी पवार साहेबांशी चर्चा करा असे मी या नेत्यांना सांगितले होते. परंतु ते पवार साहेबांना पुढे भेटले किंवा नाही याबाबत मला नंतर काहीही माहिती नाही असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
विशेष बाब म्हणजे, दोन महिन्यांपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत कोंडी होत असल्याचं सांगत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केलं. त्यानंतर भाजपसोबत हातमिळवणी करत त्यांनी राज्यात नवं सरकार स्थापन केलं. मात्र, युती सरकारच्या काळातच त्यांना भाजपासोबत फारकत घ्यायची होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट चव्हाणांनी केला. त्यांच्या या गौप्यस्फोटानंतर एकनाथ शिंदे यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.