Maha Vikas Aghadi News Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: सीएमपदासाठी उद्धव ठाकरेंकडून तडजोड, काँग्रेस-शरद पवार गटाला मुंबईतील जागा सोडणार?

Maha Vikas Aghadi News: उद्धव ठाकरेंना मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा यासाठी ठाकरे गटाची मोठी कसरत सुरूय. मात्र तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंना दाद द्यायला तयार नाही.

Vinod Patil

उद्धव ठाकरेंना मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा यासाठी ठाकरे गटाची मोठी कसरत सुरूय. मात्र तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंना दाद द्यायला तयार नाही. आता तर ठाकरे गट थेट मुंबईतल्या जागांवर तडजोड करण्यास तयार असल्याच माहिती सूत्रांनी दिलीय. 2019 साली उद्धव ठाकरेंनी भाजपासोबत मुंबईत 19 जागा लढवल्या. मात्र आता मविआत उद्धव ठाकरेंनी 36 पैकी केवळ 21 जागांची मागणी केलीय.

म्हणजे केवळ दोन वाढीव जागांची मागणी, तर ठाकरे गटातले नेते मात्र तब्बल २८ जागा लढवण्यासाठी आग्रही आहेत. मात्र उद्धव ठाकरे जागांची तडजोड करून मुख्यमंत्रिपदाची फिल्डिंग लावत असल्याची चर्चा साम टीव्हीला सूत्रांनी दिलीय. तर दुसरीकडे मुंबईत मात्र ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचं त्यांचेच मित्रपक्ष म्हणतायत.

शनिवारी महाविकास आघाडीची बैठक मुंबईत झाली, यात ठाकरेंची शिवसेनेनं 21 जागांचा प्रस्ताव, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 7 आणि काँग्रेसने 14 जागांचा प्रस्ताव दिलाय.

काही दिवसांपूर्वी झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यातही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाबाबत जाहीरपणे चेहरा जाहीर करण्याची मागणी केली होती.

महायुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढतेय तर महाविकास आघाडीचा अजूनही सीएमपदाचा चेहरा जाहीर करण्यात आलेला नाही. शिंदेंना थेट आव्हान द्यायचं असेल तर त्यांच्यासारखंच निवडणुकीत नेतृत्व मिळायला हवं, असा ठाकरे गटाचा आग्रह आहे. त्यामुळेच ठाकरे आता सीएमपदाच्या चेहऱ्यासाठी थेट जागांचीही तडजोड करत असल्याची चर्चा आहे. मात्र हा फॉर्म्युला तरी काँग्रेस-राष्ट्रवादीला मान्य होणार का? याकडे लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Fort : भक्कम दुहेरी तटबंदी अन् वैभवशाली इतिहास, सोलापूरमध्ये तलावाच्या काठी वसलाय भव्य किल्ला

Maharashtra News Live Update: विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Accident: समृद्धी महामार्गावर भयंकर अपघात; पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले

Deool Band 2 Collection : स्वामी भक्तीत प्रेक्षक तल्लीन! प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २'चं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व, वाचा संडे कलेक्शन

Chanakya Niti: या ५ कारणांमुळे नवरा बायकोत होतात वाद, वेळीच घ्या योग्य निर्णय अन्यथा...

SCROLL FOR NEXT